---Advertisement---

पुन्हा WTC मध्ये भिडणार भारत-न्यूझीलंड, ‘या’ महिन्यात खेळवली जाणार मालिका

On: रविवार, जून 27, 2021 5:17 PM
---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पराभूत करून न्यूझीलंडने पहिली जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आपल्या नावे केली. त्यानंतर आता, नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड संघ दुसऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा श्रीगणेशा करेल. संघापुढे विजेतेपद कायम राखण्याचे मोठे आव्हान असेल.

न्यूझीलंड संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२०२३ अभियानाची सुरुवात भारताविरुद्धच पहिली मालिका खेळून करेल. जुलै २०२१ मध्ये दुसऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपला सुरुवात होईल. सर्व संघ तीन मालिका घरच्या मैदानावर आणि तीन मालिका विदेशात खेळतील.

असा असेल न्यूझीलंड संघाचा कार्यक्रम
नोव्हेंबरमध्ये भारताविरूद्ध मोहीम सुरू झाल्यानंतर न्यूझीलंड बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध घरच्या मैदानावर दोन-दोन सामन्यांची मालिका खेळेल. त्यानंतर पुढच्या वर्षी मे-जूनमध्ये त्यांचा सामना इंग्लंडशी होईल. या दौऱ्यावर ते तीन कसोटी सामने खेळतील. त्यानंतर संघाला दोन कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा दौरा करावा लागेल. न्यूझीलंडसाठी स्पर्धेची अखेर घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने होईल.

अधिक सामने खेळण्याची इच्छा
न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले, “गेल्या २४ तासात बऱ्याच लोकांनी मला विचारले की, आपण आणखी कसोटी सामने खेळणार आहोत का? मात्र, २०२३ पर्यंतचे वेळापत्रक तयार केले गेले आहे. परंतु, २०२३ नंतर २०३१ पर्यंतच्या फ्युचर टूर प्रोग्रामविषयी चर्चा सुरू झाली आहे. आम्ही अधिकाधिक कसोटी सामने खेळू शकलो तर चांगले होईल.”

दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या मोहीमेला सुरूवात करणार आहे. कोहलीचा संघ जो रुटच्या संघाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. भारतीय संघाला २०१९-२०२१ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव करत पहिलेवहिले विजेतेपद आपल्या नावे केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

VIDEO: झेल घेण्यासाठी चाहत्याने बाथटबमधून मारली उडी आणि पुढे घडले असे काही

सुपरफास्ट सॅम बिलिंग्स! बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करताना जबरदस्त थ्रो करत उडवल्या बेल्स, व्हिडिओ व्हायरल

कर्णधार असावी तर अशी! पदार्पणाचा वनडे सामना खेळण्यापूर्वी मितालीने शेफाली वर्माला ‘असे’ दिले प्रोत्साहन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---