जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड जबरदस्त फॉर्ममध्ये दिसले. लंडच्या ओव्हल स्टेडियमवर बुधवारी (7 जून) हा सामना सुरू झाला. भारतीय वेगावन गोलंदाजांनी आपल्या संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. मात्र, स्मिथ आणि हेडने चौथ्या विकेटसाठी मोधी भागीदारी केली. अशात अनेकजन सर्वोत्तम कसोटी गोलंदाज अशी ओळख असणाऱ्या रविचंद्रन अश्विन याची आठवण काढत आहेत. भारताचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांनी अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह उतरले आहेत. मात्र, अनेकांच्या मते फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहिजे होता. ओव्हलवरील ग्रीन टॉप खेळपट्टी पाहून याठिकाणी वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार, असे स्पष्टपणे दिसत होते. याच पार्श्वभूमिवर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी फिरकीपटू अश्विनला संघातून बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय चुकल्याचेच दिसते. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) देखील अश्विनला बेंचवर बसवल्यामुळे नाराज दिसले.
डब्ल्यूटीसी फायलनदरम्यान सुनील गावसकर समालोचन करत आहेत. यादरम्यान त्यांनी अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यामुळे नाराजी व्यक्त केली. गावसकर म्हणाले, “रविचंद्रन अश्विन संघात नसल्यामुळे हैराण आहे. त्याच्यामुळेच संघ इथपर्यंत पोहोचला. या खेळपट्टीवर अश्विनने नक्कीच कोणते मोठे नुकसान केले नसते. उमेश यादवच्या जागी अश्विनला संघात सामील करता आले असते.” यावेळी त्याठिकाणी हरभनज देखील उपस्थित होता आणि त्यानेही गावसकरांच्या मताशी महमती दर्शवली.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 3 बाद 327 धावा केल्या आहेत. स्टीव स्मिथ 95*, तर ट्रेविस हेड 146* धावांसह खेळप्टीवर कायम आहेत. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर या वेगवान गोलंदाजंनी भारतासाठी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. उमेश यादव आणि रविंद्र जडेजा यांना सामन्याच्या पहिल्या दिवशी एकही विकेट मिळाली नाही. (WTC Final । Sunil Gavaskar upset over leaving Ravichandran Ashwin out of the playing XI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बीसीसीआयने विराटवर अन्याय केला…’, WTC Finalदरम्यान माजी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे खळबळजनक भाष्य
ICC बादफेरीत चमकला स्मिथ, ‘या’ विक्रमात कॅलिस-संगकाराची बरोबरी, पण विराटचा रेकॉर्ड मोडण्यात अपयशी