जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना येत्या 7 जूनपासून खेळला जाणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक आजी-माजी खेळाडू आपापली मते मांडत आहेत. नुकतेच भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग याने म्हटले होते की, केएस भरत याला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ईशान किशन याच्या जागी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली पाहिजे. मात्र, आता त्याने आपल्या वक्तव्यावरून माघार घेतली आहे.
भारताचा 42 वर्षीय माजी खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला आहे की, त्याला केएस भरत (KS Bharat) याच्या फलंदाजी क्षमतांवर विश्वास नाहीये. त्याच्या मते, ईशान किशन रिषभ पंत याच्याप्रमाणे आक्रमक फलंदाजी करू शकतो. अशाप्रकारे रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने त्याला अंतिम सामन्यासाठी संघात ठेवण्यावर विचार केला पाहिजे.
विशेष म्हणजे, केएस भरत याने भारतासाठी आतापर्यंत 4 कसोटी सामने खेळले आहे, पण त्यात त्याला महत्त्वपूर्ण योगदान देता आले नाहीये. दुसरीकडे, किशन याने आतापर्यंत कसोटी पदार्पण केले नाहीये, पण त्याने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023 हंगामात चांगली कामगिरी केली होती.
काय म्हणाला हरभजन?
हरभजन म्हणाला की, “ईशान किशन याला भरतच्या पुढे का मानले पाहिजे? मला वाटते की, यामुळे फलंदाजी आणखी मजबूत होईल. कारण, ईशान किशन नवीन चेंडूला भरतपेक्षा चांगल्याप्रकारे खेळू शकतो. तो सलामीवीरही आहे आणि चांगल्या फॉर्ममध्येही आहे. त्यामुळे जर 80 षटकांनंतर दुसरा नवीन चेंडू टाकला गेला आणि ईशान फलंदाजीसाठी गेला, तर तो सलामीवीराच्या रूपातही खेळू शकतो.”
“रिषभ पंत एक विस्फोटक फलंदाज आहे आणि ईशान किशनमध्येही हाच गुण आहे. भरत यष्टीमागे शानदार आहे, पण मला भरतच्या फलंदाजीवर जास्त विश्वास नाहीये.”
अंतिम सामना
डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेजलवूड हादेखील बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मायकल नेसर याला संघात घेतले जाईल, तर हेजलवूडच्या जागी स्कॉट बोलँड याला अंतिम अकरामध्ये सामील करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय संघाबाबत बोलायचं झालं, तर अद्याप कोणताही खेळाडू दुखापतीपासून दूर आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना लंडनच्या के ओव्हल येथे 7 ते 11 जूनदरम्यान पार पडेल. (wtc final 2023 harbhajan singh on this indian cricketer read here )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
देव माणुस! वीरेंद्र सेहवागची मोठी घोषणा, ओडिशा अपघातग्रस्तांच्या मुलांचे भविष्य केले सुरक्षित
रिषभला क्रिकेटपासून दूर राहवेना! WTC फायनलआधी ट्विट करत म्हणाला…