भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे. या संघात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच संघातील दिग्गज गोलंदाज देखील या सामन्यातून पुनरागमन करताना दिसून येणार आहेत. तत्पूर्वी भारतीय संघाचा माजी गोलंदाज आशिष नेहरा याने भारतीय संघातील गोलंदाजांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघासाठी १७ कसोटी सामने आणि १२० वनडे सामने खेळणाऱ्या आशिष नेहराने म्हटले की, “भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाकडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. परंतु जर तुम्ही जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीबद्दल बोलत असाल; तर ते सपाट खेळपट्टीवरही उत्कृष्ट गोलंदाजी करू शकतात. या दोघांशिवाय इशांत शर्मा देखील आहे. त्याच्याकडे तर १०० कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “जर तुम्ही गवताळ खेळपट्टीवर खेळत असाल; तर तुम्ही अतिरिक्त वेगवान गोलंदाज जोडण्याचा निश्चितपणे विचार करू शकता. जो मला वाटतो की, मोहम्मद सिराज असावा. कारण तो उत्तम गोलंदाजी करीत आहे. अन्यथा माझ्या मते गोलंदाजी आक्रमणमध्ये इशांत, बुमराह आणि शमी हे तिघेही वेगवान गोलंदाज असावेत. यासोबतच अश्विन आणि जडेजाच्या रूपात फिरकी गोलंदाज देखील असले पाहिजे.”
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), ऋधिमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जुन नगवासवाला
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या-
गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची
पायात घुसली होती बंदुकीची गोळी तरीही ‘तो’ आज खेळतोय क्रिकेट; विराटसारख्या फलंदाजाला केले होते त्रस्त
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार असताना सर्वोच्च खेळी करणारे ३ फलंदाज