---Advertisement---

“न्यूझीलंड क्रिकेटमधला हा सुवर्णक्षण, याचे सर्व श्रेय…”, किवी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने

On: शुक्रवार, जून 25, 2021 2:06 AM
---Advertisement---

विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला हरवून इतिहास रचला. न्यूझीलंड संघाची क्रिकेटच्या जगात सगळीकडे वाहवा होत आहे. न्यूझीलंड संघाच्या इतिहासातील हा सुवर्ण दिवस आहे. दरम्यान,न्यूझीलंडच्या माजी खेळाडूने सर्व खेळाडूंचे भरभरून कौतुक केले आहे.

न्यूझीलंड संघाचे माजी खेळाडू रिचर्ड हेडली यांनी सांगितले की, “हा एक सुंदर कसोटी सामना होता. ज्यामध्ये खूप चढ-उतार पाहण्यास मिळाले. न्यूझीलंड संघाने भारतासारख्या चांगल्या संघाविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. इतक्या वर्षानंतर न्यूझीलंडकडे एकापेक्षा एक सरस खेळाडू झाले आहेत.”

हेडली पुढे सांगतात, “हे आता खरे आहे की, न्यूझीलंड क्रिकेटमधला हा सुवर्णक्षण आहे. याचे सर्व श्रेय २ वर्ष केलेल्या मेहनतीला जाते. गेले २ वर्ष न्यूझीलंड संघ जबरदस्त खेळ करतो आहे. घरच्या आणि विदेशी मैदानांवर चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळेच आज ते कसोटी विश्वविजेता बनण्याचे खरे मानकरी आहेत.”

त्यांनी सांगितले की, “पूर्ण संघानेच उत्तम खेळ केला आहे. सर्वांनी एकमेकांना चांगली साथ दिली. संघ व्यवस्थापन मंडळ आणि इत्तर कर्मचारी यांची भूमिकासुद्धा महत्वाची होती.”

२१ वर्षांनंतर न्यूझीलंडला आयसीसीचे विजेतेपद
सातत्याने पावसाचा येणारा व्यत्यय, कधी कमी प्रकाशाचा व्यत्यय अशा काही अडचणी येऊनही न्यूझीलंडने अंतिम सामन्यात अखेरपर्यंत हार न मानता विजय मिळवला आणि तब्बल २१ वर्षांनी आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले.

यापूर्वी न्यूझीलंडने शेवटचे आयसीसी विजेतेपद २००० साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळवले होते. त्यावेळीही अंतिम सामन्यात भारतालाच पराभूत केले होते. त्यानंतर न्यूझीलंडला दोन वेळा आयसीसी विजेतेपदाने हुलकावणी दिली. एकदा २०१५ विश्वचषकात तर दुसऱ्यांदा २०१९ विश्वचषकात, या दोन्ही स्पर्धांमध्ये न्यूझीलंड उपविजेता ठरला होता. मात्र, यावेळी न्यूझीलंडने अखेर आयसीसीचे विजेतेपद मिळवले.

महत्त्वाच्या बातम्या – 

“कुलदीपच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला कर्णधार विराटसह वरिष्ठ खेळाडूंच्या सहकार्याची गरज”

धोक्याची घंटा! ‘या’ ४ खेळाडूंचे अपयश भारताला भोवले, संघातील स्थानावरही उभे आहे प्रश्नचिन्ह

कर्णधार कोहलीचा पंतला पूर्ण पाठिंबा; म्हणाला, ‘त्याने असेच खेळत राहावे, हीच आमची इच्छा’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---