विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये खेळला जात आहे. परंतु शुक्रवारी (१८ जून ) सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन झाले होते. त्यांनतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. परंतु चौथ्या दिवशी देखील पावसाने अडथळा निर्माण केला. त्यामुळे क्रिकेटपटूंसह चाहतेही निराश झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच सर्वांचेच लक्ष आता राखीव दिवसाकडे लागून आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या काही दिवसांपुर्वीच आयसीसीने राखीव दिवसाची घोषणा केली होती. इंग्लंडमधील बदलते वातावरण पाहता त्यांनी २३ जून हा अतिरिक्त दिवस राखीव ठेवला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अशी आशा आहे की, या सामन्याच्या निकाल राखीव दिवशी लागू शकतो. परंतु अद्याप हे स्पष्ट झालेले नाही.
सामना राखीव दिवशी खेळवायचा की नाही? हे सामना अधिकाऱ्यांच्या हातात आहे. हा निर्णय सामन्याच्या पाचव्या दिवशी (२२ जून) घेतला जाईल. (WTC final: call on reserve day Will Take On day 5 if match officials feel it is needed)
काय म्हणतो राखीव दिवसाचा नियम?
आयसीसीच्या एका सूत्राने एएनआयला सांगितले की, “राखीव दिवस तेव्हाच लागू करण्यात येईल जेव्हा सामना अधिकारी म्हणतील. खेळाच्या पाचव्या दिवशी त्यांना अंदाज येईलच की, राखीव दिवशी सामना खेळवण्याची आवश्यकता आहे की नाही.”
आयसीसीने ठरवलेल्या नियमानुसार, सामना अनिर्णीत किंवा बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. तसेच या सामन्यात वाया गेलेला वेळ राखीव दिवशी भरून काढता येऊ शकतो. या सामन्याला खऱ्या अर्थाने १९ जून रोजी प्रारंभ झाला आहे. तसेच २२ जून रोजी या सामन्याचा अंतिम दिवस असणार आहे. तसेच २३ जून या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
कधी होऊ शकतो राखीव दिवसाचा वापर?
इंग्लंडमधील हवामान खात्याने यापूर्वीच अंदाज व्यक्त केला होता की, साउथॅम्प्टनमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पाचही दिवस पाऊस पडण्याची शक्यता असेल. त्यामुळे आयसीसीने राखीव दिवसाची घोषणा केली होती. याचा वापर फक्त वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी केला जाणार आहे. परंतु पाच दिवसात निकाल आला नाही, तर अशा परिस्थितीत सामना अनिर्णित ठरवला जाईल आणि दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या –
सोडा-चखण्याचा बंदोबस्त झालाय! सिराजच्या ‘त्या’ फोटोमुळे गुरुजींवरही बनले भन्नाट मीम्स
बुमराहच्या गोलंदाजीवर दिग्गजाने उपस्थित केले प्रश्न, गेल्या १०५ षटकांत घेतल्यात फक्त ७ विकेट्स
कसोटी चँपियनशीप अंतिम सामना ड्रॉ झाल्यास कोणत्या संघाला मिळणार किती ‘प्राइज मनी’? वाचा