---Advertisement---

WTC Final: न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजापासून पुजाराला आहे धोका; आत्तापर्यंत ४ वेळा केलंय बाद

On: बुधवार, जून 9, 2021 10:04 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेअंतर्गत होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात साऊथॅम्पटन येथे होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ इंग्लंडला पोहचले असून हा सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. ही पहिलीच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा असल्याने विजेतेपद कोण मिळवणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या फलंदाजीची मोठी जबाबदारी चेतेश्वर पुजारावर असणार आहे. त्याने आतापर्यंत अनेकदा भारताचा त्याच्या फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवून दिले आहेत. खेळपट्टीवर टिकून टिच्चून फलंदाजी करण्यासाठी पुजारा ओळखला जातो. त्यामुळे त्याला बाद करण्याचं मोठं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर असते.

पण असे असले तरी, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा एक गोलंदाज पुजारासाठी त्रासदायक ठरु शकतो. हा गोलंदाज म्हणजे ट्रेंट बोल्ट. डावकरी वेगवान गोलंदाज असलेल्या बोल्टने पुजाराला नेहमीच अडचणीत टाकले आहे. पुजारा आणि बोल्ट आत्तापर्यंत १७ डावात आमने-सामने आले आहेत. यामध्ये ४ वेळा बोल्टने पुजाराला बाद केले आहे. तर, पुजाराने बोल्टच्या २९९ चेंडूंचा सामना केला असून ३३.२५ च्या सरासरीने १३३ धावा केल्या आहेत.

बोल्टची भारताविरुद्ध चांगली कामगिरी 
बोल्टची भारताविरुद्ध आत्तापर्यंतची कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने भारताविरुद्ध ९ कसोटी सामने खेळले असून २९.५२ च्या सरासरीने ३६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २०२० साली झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ११ विकेट्स घेतल्या होत्या. याच मालिकेत त्याने २ वेळा पुजाराला बाद केले होते.

पुजाराला सुधारावा लागेल खेळ
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आत्तापर्यंत पुजाराची कामगिरी समाधानकारक झाली आहे. त्याने या स्पर्धेत १७ सामन्यांत २९.२१ च्या सरासरीने ८१८ धावा केल्या आहेत. या ९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला १७ सामन्यांत एकदाही शतक करता आलेले नाही. तसेच तो ३ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. त्यामुळे त्याला अंतिम सामन्यात आपला खेळ सुधारावा लागणार आहे.

अशी आहे पुजारा आणि बोल्टची कसोटी कारकिर्द
पुजाराने आत्तापर्यंत त्याच्या कसोटी कारकिर्दीत ८५ सामने खेळले असून ४६.५९ च्या सरासरीने ६२४४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १८ शतकांचा आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच बोल्टने आत्तापर्यंत ७१ कसोटी सामने खेळले असून २८.०२ च्या सरासरीने २८१ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने ८ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तर एकवेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

न्यूझीलंड संघासाठी धोक्याची घंटा!! संघातील ‘हे’ २ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे होऊ शकतात संघाबाहेर

आयसीसीकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत २०२०-२१ कसोटी मालिकेचा मोठा गौरव; भारतीय चाहते ऐकून होतील खूश

वाढदिवस विशेष: प्रेक्षकांचा आवडता ऑस्ट्रेलियन खेळाडू दारुमुळे संपला, वाचा ‘त्या’ क्रिकेटरची कहाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---