विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंडचा अंतिम सामना चांगलाच रंगतो आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला अर्धशतकीय सलामीची सुरुवात करून दिली. परंतु, जेवणाच्या सत्रा अगोदरच दोन्ही सलामीवीर बाद झाले. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकवर खेळणारा चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला होता. मात्र केवळ ८ धावांवर त्याला पव्हेलियनला परतावे लागले. यानंतर आता दक्षिण आफ्रिकाचा ३७ वर्षीय गोलंदाज डेल स्टेनने त्याला फलंदाजीबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा पुजारा आपल्या संथ खेळीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु, त्याने खूपवेळा लोकांना सिद्ध करून दाखवले की, लोकांच्या या बोलण्याला तो जास्त मनावर घेत नाही. भारतीय संघासाठी कसोटीमध्ये पुजारा एक विश्वासू फलंदाज आहे आणि त्याची तुलना महान फलंदाज राहुल द्रविडसोबत केली जाते.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुद्धा पुजाराने आपल्या फलंदाजीची सुरुवात अतिशय संथपणे केली. पुजाराने त्याची पहिली वैयक्तिक धाव घेण्यासाठी तब्बल ३५ चेंडूचा सामना केला. ३६व्या चेंडूवर कवर्सला चौकार खेचून पुजाराने आपले खाते खोलले. पहिला चौकार निघाल्यानंतरही पुजाराने आपली फलंदाजी तशीच चालू ठेवली. दरम्यान ट्रेंट बोल्टच्या इनस्विंगवर तो पायचित झाला.
या सामन्याचा पहिल्या डावातील पुजाराच्या फलंदाजीबद्दल बोलताना डेल स्टेनने सागितले की, “तुम्ही पुजारासारखी इतर कोणाला फलंदाजी करताना बघू इच्छिता. आता त्याने ५० चेंडूंचा सामना केला आहे तर, आपणास माहित आहे तो अशाच प्रकारचा फलंदाज आहे. मला विश्वास आहे त्याने व्हिडीओमार्फत तो कसा बाद झाला? या गोष्टीचे आकलन केले असेल. यावरुन त्याला हेही समजले असेल की, अशा गोलंदाजीवर स्ट्राईक बदलणे हा एकमेव मार्ग आहे.”
“मी त्याला फलंदाजी करताना पहिले होते. त्याने ०, ०, ०, ०, ०, ४, ४, ०, ०, ०, ०, ० अशाप्रकारे धावा केल्या आणि तो बाद झाला. मला वाटते की, आपल्या खेळीदरम्यान त्याने ज्या ५० चेंडूंचा सामना केला; त्यामध्ये त्याने स्ट्राईक बदलण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे होते. ज्यामुळे त्याला आपल्यासाठी आणि संघासाठी धावा करता आल्या असत्या,” असे शेवटी स्टेन म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम, न्यूझीलंडच्या एकट्या फलंदाजाने केला
वयाची तिशी ओलांडूनही एका युवकाप्रमाणे न्यूझीलंडचा यष्टीरक्षक करतोय यष्टीरक्षण, एकदा बघाच
लाईव्ह सामन्यात कर्णधार कोहली इशांतला म्हणाला, ‘काय रे, ओरडतोय की विचारतोय’