भारतीय संघात गेल्या काही महिन्यांपासून स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेला यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या नवीन भूमिकेत दिसून येत आहे. साउथॅम्प्टनच्या द रोज बाउल स्टेडियममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात दिनेश कार्तिक समालोचकाची भूमिका पार पाडताना दिसून येत आहे. अशातच त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीची स्तुती केल्याचे पाहायला मिळाले आहे.
दिनेश कार्तिकने समालोचन करताना म्हटले की, “विराट कोहलीने जो गोलंदाजीमध्ये बदल केला, तो खरच प्रेरणादायी होता. विराट कोहलीला शमीवर खूप विश्वास आहे.”
तसेच दिनेश कार्तिक सोबत समालोचन करत असलेल्या साइमन डूलने म्हटले की, “विराट कोहलीने ज्याप्रकारे गोलंदाजीमध्ये बदल केला, त्यामुळे भारतीय संघाला यश मिळाले.”(WTC FINAL : Dinesh Karhik praised virat kohli for his brilliant captaincy)
नासिर हुसेन यांनी देखील केले भाष्य
माजी इंग्लिश कर्णधार नासिर हुसेन यांनी देखील विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी स्टार स्पोर्ट्ससोबत चर्चा करताना म्हटले की, “विराट कोहलीची कारकीर्द संपल्यानंतर तो एक महान कर्णधार बनेल.”विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठमोठ्या मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच ऑस्ट्रेलियन संघाला सलग दोन मालिकांमध्ये त्यांच्याच देशात जाऊन पराभूत केले आहे.
शमी आणि ईशांतची धारदार गोलंदाजी
खेळाच्या पाचव्या दिवशी भारतीय संघातील गोलंदाजांनी योग्य लाईन लेंथने गोलंदाजी केली. ज्यामुळे न्यूझीलंड संघातील फलंदाजांना मुक्तपणे खेळता आले नाही. त्यानंतर शमीने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने आधी रॉस टेलरला माघारी धाडले. त्यानंतर ईशांत शर्मानेही उत्कृष्ट गोलंदाजी करत हेनरी निकोलसला बाद केले. तसेच आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत असलेल्या बीजे वॉटलिंगची यष्टी उधळत शमीने भारतीय संघाचा मार्ग आणखी मोकळा करून दिला. शमीने या सामन्यात ४ गडी बाद केले. तसेच ईशांत शर्माला २ गडी बाद करण्यात यश आले.
महत्वाच्या बातम्या-
विंडीजला तिहेरी धक्का, कसोटी मालिकेत ०-२ ने धुव्वा उडाल्यानंतर आयसीसीने ठोठावला मोठा दंड
आजच्याच दिवशी ८ वर्षांपुर्वी ‘धोनी आणि कंपनी’ने रचला होता इतिहास, बनला होता एकमेवाद्वितीय कर्णधार
जसप्रीत बुमराहकडून झाली ‘मोठी चूक’, लाईव्ह सामन्यात मैदान सोडून जावं लागलं बाहेर