विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांनी भारतीय संघाचा फलंदाजी क्रम उद्ध्वस्त केल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. दुसऱ्या डावात भारतीय संघाने आणखी काही धावा केल्या असत्या तर, सामन्याचा निकाल काही वेगळा लागू शकला असता, असे मत अनेकांनी मांडले.
भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात रिषभ पंतने सर्वाधिक ४१ धावा केल्या, तरीदेखील दिग्गज खेळाडू त्याच्यावर टीका करत आहेत. काय आहे कारण चला जाणून घेऊया.
रिषभ पंतने गेल्या काही महिन्यांत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवण्यात देखील त्याचा मोलाचा वाटा आहे. परंतु अंतिम सामन्यात जेव्हा संघाला त्याची खरी गरज होती, तेव्हा तो खराब शॉट खेळून बाद झाला.
रिषभने दुसऱ्या डावात ८८ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तो ट्रेंट बोल्टला पुढे येऊन षटकार मारण्याचा प्रयत्नात झेल बाद झाला. त्यामुळे दिग्गज खेळाडूंनी त्याच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.(WTC final : Former Indian cricketers akash chopda and irfan pathan criticise Rishabh pant)
माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना निराश दिसून आला. त्याने म्हटले की, “आक्रमकता आणि मूर्खपणा यात थोडा फरक आहे, जलद गोलंदाजाविरुद्ध पुढे येऊन षटकार मारणे, आक्रमकता नव्हे तर मूर्खपणा आहे.”
तसेच आकाश चोप्रा म्हणाला की, “आम्ही पंतला आयपीएल स्पर्धेत अनेकदा षटकार मारताना पहिलं आहे. परंतु यावेळी तो जास्त जोखीम घेत होता. आयपीएलमध्ये आपण त्याला असे षटकार मारताना कधीच पहिले नाही. तो आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजांना पुढे येऊन षटकार लगावताना दिसून आला नाही.”
पंत जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आला होता, तेव्हा भारतीय संघ अडचणीत होता. त्याने भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले, परंतु तो आणखी मोठी खेळी करू शकला असता. भारतीय संघाला दुसऱ्या डावात अवघ्या १७० धावा करण्यात यश आले होते. तसेच पहिल्या डावातील ३२ धावांच्या पिछाडीमुळे न्यूझीलंडला केवळ १३९ धावांचे आव्हान देता आले. हे आव्हान न्यूझीलंडने ४६ षटकात पार करत सामना जिंकला.
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्माकडे विराट कोहली सोपवणार कर्णधारपदाची जबाबदारी? माजी दिग्गजाची भविष्यवाणी होणार खरी?
WTC फायनल: तीन वर्षांनंतर पुन्हा भारतीय फलंदाजांच्या नावे झाला ‘तो’ लाजीरवाणा विक्रम
WTC फायनलमध्ये न्यूझीलंडचा गाजावाजा! कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पहिल्यांदाच केलाय ‘हा’ कारनामा