जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याला ५ दिवस होऊन गेल्यानंतरही या सामन्याचा निकाल लागला नाही. अखेर राखीव दिवसाच्या खेळावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील या ऐतिहासिक सामन्याचा निकाल ठरणार आहे. त्यामुळे सर्व चाहत्यांचे लक्ष या जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिलावहिला विजेते कोण बनेल? यावर आहे. ५ दिवसांच्या खेळानंतर आज (२३ जून) राखीव दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. या राखीव दिवसासाठी आयसीसीने काही नियम सांगितले आहेत.
साऊथॅम्प्टनच्या एजेस बाऊल स्टेडियम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाऊस आणि खराब प्रकाशामुळे दोन दिवसांपेक्षा जास्त खेळ रद्द झाला आहे आणि म्हणूनच आता हा सहावा दिवस म्हणजेच राखीव दिवसा खेळवला जात आहे. आयसीसीने राखीव दिवसासाठी काही नियम बनवले आहेत, ज्यामध्ये सहाव्या दिवशी किती षटके गोलंदाजी केली जाईल आणि शेवटच्या तासात काय होईल? हे सांगितले आहे.
आयसीसीच्या नव्या नियमांनुसार राखीव दिवसाचा कालावधी हा ३३० मिनिटे किंवा ८३ षटकांचा असेल. त्याशिवाय सामन्यानुसार शेवटच्या सत्रात वेळ एक तासाने वाढविला जाऊ शकतो. कारण, सामन्यादरम्यान एका दिवशीही ९८ षटके खेळली जाऊ शकली नाहीत. आयसीसीच्या नियमानुसार पंच राखीव दिवसाच्या शेवटच्या तासाच्या खेळाला सुरूवात करण्याआधी संकेत देतील. सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघ एकत्रितपणे विजेते घोषित केले जातील आणि सामन्याच्या मध्यभागी दोन्ही संघांना असे वाटत असेल की सामन्याचा निकाल यापुढे शक्य नाही, तर दोन्ही कर्णधार एकमेकांशी बोलून नंतर सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेऊ शकतात .
आतापर्यंत सामन्याची स्तिथी अशी आहे की, भारतीय संघाकडे ५० पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रतीउत्तरात न्यूझीलंड संघाने २४९ धावा केल्या. न्यूझीलंड संघाला रोखण्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी संघासाठी ४ विकेट्स घेतल्या. भारताचा दुसरा डाव सुरु आहे. सध्या उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत फलंदाजी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
ऐतिहासिक कसोटीच्या शेवटच्या दिवसासाठी काय असणार किवींची रणनीती? साउदीने केला खुलासा
चाहता म्हणाला, ‘प्लिज विलियम्सनला तंबूत पाठवा’; मग सोनू सूदने आपल्या उत्तरानेच केले बोल्ड
PSL 2021: पोलिसांकडून हैदराबादमधील सट्टेबाजांच्या टोळीचा भांडाफोड, ५ आरोपींना अटक