येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने सामने असणार आहेत. या सामन्यासाठी बीसीसीआयने २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. अशातच भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक या सामन्यात वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे.
कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आयसीसीने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. दोन वर्षानंतर दोन बलाढ्य संघ अंतिम सामन्यात एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे या सामन्याचे आयोजन हटके करण्याचा आयसीसीचा प्रयत्न असणार आहे. या सामन्यासाठी आयसीसी समालोचकांची यादी जाहीर करणार आहे, ज्यामध्ये भारतातून दिनेश कार्तिक आणि सुनील गावसकर यांचे नाव सुचवले आहे.
आयसीसीच्या समालोचकांच्या यादीत हे दोन भारतीय आहेत ज्यांना अंतिम सामन्यात समालोचन करण्याची संधी मिळणार आहे. तसेच न्यूझीलंडकडून साइमन डूलदेखील समालोचन करताना दिसू शकतात. यासोबतच न्यूट्रल समालोचक म्हणून माइकल एथर्टन आणि नासिर हुसेन यांचा समावेश केला जाऊ शकतो.
According to Cricbuzz – ICC likely to pick Nasser Hussian, Mike Atherton as neutral commentators then Dinesh Karthik, Sunil Gavaskar from India and Simon Doull from New Zealand for the WTC final. #INDvNZ
— Johns. (@CricCrazyJohns) May 24, 2021
द हंड्रेड लीगमध्येही करणार समालोचन
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसह दिनेश कार्तिक द हंड्रेड क्रिकेट लीगमध्येही समालोचन करताना दिसून येणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात भारतातून समालोचन करण्याचा मान दिनेश कार्तिकला मिळाला आहे. या भूमिकेसाठी ब्रॉडकास्टर स्काय स्पोर्ट्सने त्याची निवड केली आहे. तो केविन पीटरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि डेव्हिड लॉयड या दिग्गज क्रिकेटपटूंसोबत समालोचन करताना दिसून येणार आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेत दिनेश कार्तिकला उल्लेखनीय कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्याने ७ सामन्यात १२३ धावा केल्या होत्या. आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आयपीएल स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. हा यष्टीरक्षक फलंदाज मागील २ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसून आला नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या-
ना रोहित ना विराट ना पुजारा, भारताच्या ‘या’ स्फोटक फलंदाजाला घाबरला बलाढ्य न्यूझीलंड संघ
रिषभ पंतला ‘अशाप्रकारे’ बाद करणार न्यूझीलंड, गोलंदाजी प्रशिक्षकाने केला खुलासा
टी२० क्रिकेटमध्ये ‘सुपर फ्लॉप’ ठरलेले तीन फलंदाज; दोघांचे आहे मुंबई इंडियन्सशी नाते