जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना साउथम्प्टन येथील एजेस बाउल मैदानावर रंगणार आहे. १८ जून रोजी या ऐतिहासिक सामन्याचा शुभारंभ होणे अपेक्षित होतो. परंतु पावसामुळे सामन्याचा पहिला दिवस रद्द करण्यात आला. मात्र आता क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी खुशखबरी आहे. सध्या साऊथम्प्टनमधील आभाळ स्वच्छ झाले असून तिथे सूर्यप्रकाशही पडला आहे.
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचे समालोचन करणारा भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने शनिवारी (१९ जून) सकाळी साऊथम्प्टनमधील एजेस बाउल मैदानाचा फोटो त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. त्या फोटोमध्ये मैदानात एकदम स्वच्छ हवामान दिसत आहे . सोबतच ऊनही पडले असल्याचे दिसत आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा शुक्रवार (18 जून) पासून सुरू होणार होता. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आणि नाणेफेकही होऊ शकले नाही. या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी आयसीसीने २३ जून हा राखीव दिवस ठेवला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर आता सामना पूर्ण करण्यासाठी २३ जून या राखीव दिवसाचा वापर केला जाईल.
Waking up to the sun ☀️#WTCFinal pic.twitter.com/ksizgYYwbB
— DK (@DineshKarthik) June 19, 2021
ALERT: A clear, sunny day beckons in Southampton. It’s bright in the morning, covers are off and play will start bang on time! Don’t think captains would now be tempted to bowl first #INDvsNZ #WTCFinal pic.twitter.com/Vrv8cnXcOL
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) June 19, 2021
भारतीय संघाने या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंची निवड केली आहे. मात्र न्यूझीलंड संघाने अद्याप त्यांचे ११ खेळाडू जाहीर केलेले नाहीत. अशात न्यूझीलंडचा संघ कोणत्या रणनितीसह मैदानावर उतरेल हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
भन्नाटच! रिषभ पंतची बहीण इंग्लंडमध्ये करतेय मज्जा; व्हिडिओत दिसली झोका खेळताना
‘किवींना बालपणीपासूनच स्विंग चेंडूची सवय, पण भारतीयांच तसं नाही,’ दिग्गज गोलंदाज चिंतेत
पावसाची रिमझिम चालू असताना भारतीय क्रिकेटपटू खेळत होते ‘हा’ खेळ, पाहा व्हिडिओ