भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एक उत्कृष्ट फलंदाज तर आहेच, तसेच तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकदेखील आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटूंमध्ये कोहलीचे नाव सर्वात पुढे असते. फिटनेसचा फायदा त्याला क्षेत्ररक्षण करत असताना होत असतो. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध साउथम्पटनमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळत आहे. या सामन्यात कोहली अर्धशतक पूर्ण करण्यास अपयशी ठरला. परंतु, त्याने एक अप्रतिम झेल टिपून सर्वांचेच मन जिंकले आहे.
भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या करत आली नाही. भारतीय संघाचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. यामध्ये अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांचे योगदान दिले तर, कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले. तसेच रोहित शर्माने ३४ धावा केल्या होत्या. तर शुबमन गिलने २८ धावा केल्या होत्या.
विराट कोहलीने टिपला अप्रतिम झेल
प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने ३४ षटके होईपर्यंत एकही गडी गमावला नव्हता. डेवॉन कॉनवे आणि टॉम लॅथम हे दोघेही टिचून फलंदाजी करत होते. त्यावेळी कर्णधार कोहलीने आर अश्विनला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले होते. अश्विननेही कर्णधाराला निराश केले नाही. ३५वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अश्विनने दुसरा चेंडू टाकला, ज्यावर लॅथमने कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो चेंडू थेट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असलेल्या कोहलीच्या हातात गेला.
कोहलीनेही क्षणाचाही विलंब न करता हवेत उडी मारत एका हाताने अप्रतिम झेल टिपला. टॉम लॅथम ३० धावा करत माघारी परतला. (WTC final: Virat Kohli taken unbelievable catch of Tom latham)
Celebrations in the India camp 🙌#WTC21 Final | #INDvNZ pic.twitter.com/lz3ZW0FlND
— ICC (@ICC) June 20, 2021
https://twitter.com/geniuswithbat/status/1406653261390651402?s=20
काइल जेमिसनची उत्कृष्ट गोलंदाजी
तत्पुर्वी काइल जेमिसनने भारतीय संघाचा डाव संपुष्टात आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह या फलंदाजांना माघारी धाडले.
महत्त्वाच्या बातम्या-
अवघ्या २२ धावांवर अष्टपैलू अश्विन तंबूत, पत्नीने चकित होत दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
ऐतिहासिक सामन्यात फ्लॉप ठरलेल्या पुजाराला अनुभवी गोलंदाजाचा सल्ला, करायला सांगितले ‘हे’ काम
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम, न्यूझीलंडच्या एकट्या फलंदाजाने केला