जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा २३ जून रोजी समाप्त झाली. न्यूझीलंड संघाने भारताला नमवत या स्पर्धेचा पहिला विजेता बनला. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर झालेल्या या सामन्यात अखेरच्या दिवशी अखेरच्या सत्रात न्यूझीलंडने ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर न्यूझीलंडच्या संघाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच न्यूझीलंड संघ या क्षणांचा आनंद लुटताना दिसतोय. या घटनेला आठवडा उलटल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने प्रतिक्रिया दिली आहे.
‘ती’ गदा अपेक्षेपेक्षा जास्त जड
न्यूझीलंड संघाने २००० नंतर प्रथमच आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकली. त्यावेळी त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावे केलेली. न्यूझीलंडला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार केन विलियम्सनने विजेता झाल्यावर चषक म्हणून मिळालेल्या गदेविषयी बोलताना म्हटले, “मी यापूर्वी कधीही ही गदा हातात घेतली नव्हती. ती उचलणे एक वेगळाच अनुभव होता. मी विचार केला होता त्यापेक्षा ती बरीच जड आहे. हातामध्ये घेईपर्यंत ती खरी आहे की खोटी हे मला माहीत नव्हते.” न्यूझीलंड संघाने या गदेचे नामकरण ‘मायकल मेसन’ असे केले आहे. योगायोगाने या नावाचा एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू न्यूझीलंडसाठी देखील खेळला होता.
“आमचा संघ समतोल होता”
न्यूझीलंड क्रिकेटच्या अधिकृत पेजवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये बोलताना विलियम्सन म्हणाला, “अंतिम सामन्यात आमचा संघ समतोल होता. ज्यामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचे योग्य मिश्रण होते. संघाकडे सर्वात अनुभवी रॉस टेलर आहे ज्याने न्यूझीलंडची अनेक वर्ष सेवा केली आहे. बीजे वॉटलींग हा देखील खूप अनुभवी असून, त्यांनी देशाला अनेक आनंददायी क्षण दिले आहेत. हा क्षण त्यांच्या कारकिर्दीत कायम लक्षात राहील.” हा सामना बीजे वॉटलींगच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना होता.
न्यूझीलंडच्या संघाने जिंकली जागतिक कसोटी चॅम्पियनशिप
दोन वर्षे चाललेल्या व क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघावर वर्चस्व गाजवत विजेतेपद आपल्या नावे केले. कर्णधार केन विलियम्सनने दोन्ही डावात जबाबदारीने खेळ करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. वेगवान गोलंदाज कायले जेमिसनला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
कोहलीने मैदानावरची आक्रमकता कमी करायला हवी, वेस्ट इंडिज दिग्गजाचा सल्ला
आयसीसी क्रमवारीत मितालीचे राज, दमदार अर्धशतकासह पटकावले पाचवे स्थान
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुजाराला मिळणार नारळ? या तीन फलंदाजांचे आहेत पर्याय