पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (PAKvAUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीच्या मैदानावर खेळला गेला. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या या खेळपट्टीवर पाच दिवसात मिळून तीन डावही पूर्ण झाले नाहीत. अखेरीस, हा सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यानंतर आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची नवी गुणतालिका (WTC Point Table) समोर आली आहे. या यादीमध्ये हे दोन्ही संघ अव्वल असले तरी, त्यांना गुणांच्या टक्केवारीत मोठे नुकसान झाले आहे. (World Test Championship 2021-2023)
अशी आहे गुणतालिकेची स्थिती
तब्बल २४ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला या सामन्यात फारशी संधी मिळाली नाही. फलंदाजांची वर्चस्व गाजवल्यानंतर हा सामना अनिर्णीत झाला. मात्र, सामना अनिर्णित राहिल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या गुणांच्या टक्केवारीत (पीसीटी) घट झाली आहे. ताज्या गुणतालिकेनुसार, ऑस्ट्रेलिया आता ७७.७७ पीसीटीसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, पाकिस्तान ६६.६६ पीसीटीसह दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा पीसीटी ८८.६६ होता, तर पाकिस्तानचा पीसीटी ७५.०० होता. त्याच वेळी, पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव आणि २२२ धावांनी पराभव केल्यानंतर, भारत आता ५४.१६ पीसीटीसह पाचव्या क्रमांकावर आहे.
Here's how things stack up in the #WTC23 table after the drawn #PAKvAUS Test 👀 pic.twitter.com/3a60qlD2n6
— ICC (@ICC) March 8, 2022
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२०१३ मध्ये ८ मार्च २०२२ पर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही. या काळात ऑस्ट्रेलियाने चार सामने जिंकले आणि दोन सामने अनिर्णित राहिले. संघाचे आता ५६ गुण झाले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान चार विजय, एक अनिर्णित आणि एक पराभवासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचे आता ४० गुण आहेत. भारताकडून पहिली कसोटी हरल्यानंतर श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर घसरला होता. दक्षिण आफ्रिका संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
भारतीय संघ पाचव्या स्थानी
भारतीय संघाने आतापर्यंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२०२३ मध्ये पाच सामन्यांपैकी तीन गमावले आहेत आणि दोन जिंकले आहेत. या कालावधीत श्रीलंकेने दोन जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. भारतापाठोपाठ न्यूझीलंडचा क्रमांक लागतो. त्यानंतर बांगलादेश सातव्या क्रमांकावर आणि वेस्ट इंडिज आठव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा संघ अखेरच्या नवव्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या-
इंजीच्या पुतण्याने कांगारुंना चोप चोप चोपलं, पहिल्याच कसोटीत रचले मोठे विक्रम (mahasports.in)
जर्मन ओपन स्पर्धेत सिंधू-श्रीकांतचा विजयाने श्रीगणेशा; लक्ष सेनवरही राहणार नजर (mahasports.in)