ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा 172 धावांनी पराभव केला आहे. तर या सामन्यात फिरकीपटू नॅथन लायनने ऑस्ट्रेलियन संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. याबरोबरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत या विजयासह ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा भारतीय संघाला मोठा फायदा झाला तर न्यूझीलंडला संघाला दुसरा मोठा धक्का बसला. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 च्या पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमावल्यानंतर न्यूझीलंड संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत एक स्थान गमावले आहे. या पराभवानंतर किवी संघ दुसऱ्या स्थानावर घसरला. या पराभवामुळे न्यूझीलंडचे 60 टक्के गुण कमी झाले आहेत. भारतीय संघाचे 64.58 गुण आहेत. मात्र विजयानंतरही ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. संघाला 59.09 टक्के गुण आहेत.
INDIA MOVES TO NUMBER 1 IN THE WTC POINTS TABLE 🇮🇳
– Rohit & boys eyeing for WTC 2025…!!! pic.twitter.com/0qrDQR9KDR
— Johns. (@CricCrazyJohns) March 3, 2024
याबरोबरच भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-2025 मध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 5 जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत. एक कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. तसेच भारतीय संघ ध्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. भारताने या मालिकेत आधीच 3-1 अशी अभेद्य आघाडी मिळवली आहे. डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने WTC 2023-25 मध्ये 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 3 जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत.
World Test Championship #WTC points table
An enthralling Test which kept on swinging throughout, IND eventually came on top which strengthened their 2nd position.
ENG incurs their 5th defeat and they are not at halfway stage of their cycle#INDvENG pic.twitter.com/HgoWVkL3pC— Cricket baba (@Cricketbaba5) February 26, 2024
दरम्यान, न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जो पूर्णपणे चुकीचा सिद्ध झाला होता. तसेच ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 383 धावा केल्या होत्या. यामध्ये कॅमेरून ग्रीनने संघाकडून 174 धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने 40 धावांचे योगदान दिले. जोस हेझलवूडने 22 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या 179 धावांत सर्वबाद झाला होता. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 369 धावांचं लक्ष्य दिलं, त्याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 196 धावांवर ऑलआऊट झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND Vs ENG : पाचव्या कसोटीत रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय, ‘या’ दोन खेळाडूंना करणार संघातून बाहेर
- Video : बापरे..! भारतीय क्रिकेटपट्टू युझवेंद्र चहलला संगीता फोगटने उचलले डोक्यावर, अन् मग झालं असं काही