---Advertisement---

डब्ल्यू व्ही रमन यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरुन हटवण्यात आल्याने उभे झाले प्रश्न

On: शनिवार, मे 15, 2021 7:06 AM
---Advertisement---

माजी भारतीय सलामीवीर डब्ल्यू व्ही रमन यांना भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आले आहे. मात्र या निर्णयामुळे मदन लाल यांच्या नेतृत्त्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती आणि नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रमन यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषकात अंतिम फेरी गाठली होती. रमन हे भारतातील सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक मानले जातात.

मदनलाल, सुलक्षणा नाईक आणि माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग यांच्या समितीने पुन्हा प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवार यांची निवड केली आहे. 2018 मध्ये पोवार यांना प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्यात आले होते. तरीही त्यांच्याकडे पुन्हा प्रशिक्षकपद देण्यात आल्याने मदनलाल यांच्या समितीवर लोढा समितीच्या शिफारशींनुसार हा निर्णय अयोग्य असल्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘मंदी पाजी (मदनलाल) यांनी आपला 70 वा वाढदिवस यावर्षी 20 मार्च 2021 रोजी साजरा केला होता. लोढा समितीच्या शिफारशींमध्ये काही सुधारणांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत बीसीसीआयने वयोमर्यादा 70 वर्षे हटविण्याची मागणी केलेली नाही. अशा परिस्थितीत मदनलाल यांना सीएसीच्या बैठकीत कसे बसू दिले गेले?’

त्याचप्रमाणे सीएसीची आणखी एक सदस्य सुलक्षणा नाईक ही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय नाईक यांची बहीण आहे. पोवार नुकतेच सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत मुंबई संघाचे प्रशिक्षक होते. एका सूत्राने सांगितले की, ज्या प्रकारे आठ उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली होती, त्यावरून नाईक यांनी मनात विचार पक्का केला होता की, एका खराब मालिकेनंतर रमण प्रशिक्षक म्हणून राहणार नाहीत.

सुलक्षणालाही हे माहित होते की संघ निवडण्यामध्ये त्यांची काहीही भूमिका नाही. नाईकची माजी सहकारी नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या संघाची निवड केली आहे. सूत्रांनी माहिती दिली की “टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाण्यासाठी पवारांनी तयार केलेल्या संघाचे श्रेय आपण कसे घेऊ शकतात, असा एक प्रश्नही रमन यांना विचारण्यात आला होता,”

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची झाली घोषणा

अवघ्या सतराव्या वर्षी रोहतक ते सिडनी असा प्रवास करणारी ‘शानदार शेफाली’

टीम इंडियाकडे हार्दिक पंड्या आहेच, पण संघाला माझीही तेवढीच गरज; ‘या’ अष्टपैलूचे मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---