इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या 2019 आयसीसी विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या विश्वचषकासाठी डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार आणि चॅम्पियन कोफी किंग्सटनने भारतीय कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी आणि भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याचा भारतीय संघाला शुभेच्छा देणारा व्हिडिओ डब्ल्यूडब्यूई इंडियाच्या ट्विटर हँडेलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘तूम्ही हे करु शकता! डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन कोफी किंग्सटनने विराट कोहली, एमएस धोनी आणि संपूर्ण भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.’
तसेच या शुभेच्छा देताना किंग्सटनने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की ‘मी तूमचा डब्ल्यूडब्ल्यूईचा चॅम्पियन कोफी किंग्सटन, भारतीय क्रिकेट संघाला एक संदेश देत आहे. विराट कोहली, एमएस धोनी आणि संपूर्ण भारतीय संघाला मी आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी शुभेच्छा देत आहे. डू इट( हे करा).’
YOU CAN DO IT! #WWEChampion @TrueKofi wishes @imVkohli, @msdhoni and the entire #TeamIndia all the luck and positivity! @ICC #INDvSA pic.twitter.com/ASGVgGYsqF
— WWE India (@WWEIndia) June 5, 2019
किंग्सटन सध्या डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन असून त्याने शुक्रवारी झालेल्या डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियनशीपच्या सामन्यात डोल्फ जिग्लरला पराभूत केले आहे.
2019 च्या क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघाला किंग्सटनच नाही तर फुटबॉलमधील अनेक दिग्गजांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. या विश्वचषकात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे आणि या स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. आता भारताचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध रविवारी होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–धोनीचे सिक्रेट ऑस्ट्रेलिया संघाला सांगण्यास या दिग्गज खेळाडूने दिला नकार
–एनबीए फायनल्स आणि १-३ पिछाडीचा शाप!
–आयसीसी आपल्या निर्णयावर ठाम, धोनीला ‘बलिदान बॅज’ असलेले ग्लव्हज घालता येणार नाही






