---Advertisement---

असे तीन खेळाडू जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मिळवून देऊ शकतात पहिली आयपीएल ट्रॉफी

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 1:51 AM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे विराट कोहलीसारखा सुप्रसिद्ध कर्णधार आहे. जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवत आहे. पण जेव्हा आयपीएलचा प्रश्न येतो तेव्हा तो एकदाही संघाला चॅम्पियन बनवू शकलेला नाही. या संघात आतापर्यंत अनेक प्रसिद्ध खेळाडू खेळले आहेत. आयपीएल हंगाम -१४ मध्ये देखील अनेक खेळाडू या संघासाठी योगदान देत आहेत. जेव्हा यूएईमध्ये १४ व्या हंगामाचा दुसरा टप्पा सुरू होईल, तेव्हा चाहत्यांना आशा असेल की, संघ यावेळी विजेतेपद पटकावेल.

आतापर्यंत १४ व्या हंगामात आरसीबीने चांगला खेळ दाखवला आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी सात पैकी पाच सामने जिंकले आहेत आणि आणखी तीन विजय त्यांना प्लेऑफमध्ये नेतील. त्याच वेळी, तीन मोठे खेळाडू कोण आहेत जे आरसीबीला त्यांचे भाग्य बदलण्यास मदत करू शकतात आणि संघाची पहिली ट्रॉफी उंचावण्यासाठी सर्वाधिक योगदान देऊ शकतात, त्यांचा आढावा घेऊ.

१. मोहम्मद सिराज
मोहम्मद सिराज गेल्या एक वर्षापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. हे स्पष्ट आहे की, तो आता अधिक चांगला गोलंदाज झाला आहे आणि त्याला त्याची लाइन आणि लेंथ पूर्वीपेक्षा चांगली समजली आहे. त्याच्या आयपीएलच्या आकडेवारीकडे लक्ष दिले तर, ते त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्या तीन हंगामात त्याचा इकॉनॉमी रेट खराब होता. पण त्याने गेल्या दोन हंगामात चमकदार गोलंदाजी केली आहे. त्याने केवळ इकॉनॉमी रेटमध्येच सुधारला नाही तर, विकेट्सही घेण्यास सुरुवात केली.

आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्या गोलंदाजीबद्दल एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे त्याची अचूकता. पहिल्या सात सामन्यांत त्याचा इकोनॉमी रेट ७.३४ होता आणि त्याने पूर्वीपेक्षा अधिक चांगली गोलंदाजी केली. इंग्लंडमध्ये त्याचा सध्याचा विकेट घेण्याचा फॉर्म पाहता, सिराज दुसऱ्या टप्प्यामध्ये आरसीबीसाठी महत्त्वाचा खेळाडू असेल अशी अपेक्षा चाहते करू शकतात.

२. ग्लेन मॅक्सवेल
जर आयपीएलमधील ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी पाहिली तर प्रश्न पडतो की, त्याला दरवर्षी लिलावात मोठी रक्कम का मिळते? पण मॅक्सवेल इतक्या फ्रँचायझींसाठी पसंत ठरण्याचे एक मुख्य कारण म्हणजे त्याच्याकडे असेलेली अष्टपैलू कामगिरीची क्षमता. तो त्याच्या गोलंदाजीबरोबरच तुफानी फटकेबाजी करुन एकहाती सामना फिरवू शकतो.

मात्र, मॅक्सवेल आत्तापर्यंत आयपीएलमध्ये अपयशी ठरला होता. पण २०२१ हंगामात मात्र, तो शानदार फॉर्ममध्ये दिसला. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात मॅक्सवेलने दाखवून दिले आहे की, त्याला नेहमीच मोठे रक्कम का दिली जाते. त्याने ३७.१६ च्या सरासरीने २२३ धावा आणि १४४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. आता आरसीबीच्या चाहत्यांना आशा आहे की, मॅक्सवेल संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी यूएईमध्ये त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल.

३. वनिंदू हसरंगा
जुलै महिन्यात जेव्हा वानिंदू हसरंगा कोलंबोमध्ये त्याच्या फिरकी गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना गोंधळात टाकत होता. तेव्हा त्याची इंडियन प्रीमियर लीगची एंट्री होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. ही शक्यता खरी ठरली आणि त्याला ॲडम झांपाने दुसऱ्या टप्प्यात खेळण्यास नकार दिल्याने आरसीबीने आपल्या संघात घेतले.

हसरंगाकडे तळातल्या फळीत फलंदाजी करण्याचीही क्षमता आहे. त्यामुळे तो संघात समतोल राखू शकतो. तसेच मॅक्सवेल, डिविलियर्स आणि काईल जेमीसन या तिघांची अंतिम ११ जणांची निवड जवळपास पक्की आहे. त्यामुळे चौथा परदेशी खेळाडू म्हणून हसरंगा एक चांगला पर्याय ठरु शकतो. त्याने भारताच्या श्रीलंका दौऱ्यात त्यांचे कौशल्य दाखवून दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने आसामच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूला दिली महत्त्वाची जबाबदारी

भारीच! १४४ वर्षाच्या क्रिकेट इतिहासात ‘असा’ कारनामा करणारा बटलर दुसराच यष्टिरक्षक

भारताच्या ‘या’ दिग्गजाला फोन करुन मदत माग, सातत्याने अपयशी ठरणाऱ्या विराटला गावसकरांचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---