मुंबई | एमएसएलटीए वार्षिक पुरस्कार दिनानिमित्त आशियाई कुमार गटातील विजेती मिहिका यादव, भारताचा पुरुष गटातील क्र.5 खेळाडू अर्जुन कढे, भारताची महिला गटातील क्र.4 खेळाडू ऋतुजा भोसले, राष्ट्रीय सब-ज्युनियर गटातील विजेती ऋतुजा चाफळकर, भारताचा कुमार गटातील अव्वल खेळाडू सिद्धांत बांठिया या खेळाडूंना एमएसएलटीए वार्षिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण जर्मनीचे राजदूत डॉ.जुर्गेन मोर्हाड, पेट्रा मोर्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे आजीव उपाध्यक्ष शरद कन्नमवार, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, एमएसएलटीएचे उपाध्यक्ष राजीव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करून विविध गटांमध्ये अव्वल तीन खेळाडूंमध्ये येण्याचा मान मिळविणाऱ्या खेळाडूंना हि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत असल्याचे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.
राज्यातील प्रत्येक वयोगटांतील अव्वल तीन खेळाडूंना अशी एकूण 11लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी खेळाडूंना निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय नाशिकच्या डॉ.विजय थिटे, यवतमाळच्या राजेश दावे आणि अमरावतीच्या दिपक सोमय्या यांनी टेनिस खेळाच्या विकासासाठी व प्रचारासाठी कार्य केल्याबाद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. महाराष्ट्राला राष्ट्रीय खेळाडू मिळवून देणाऱ्या प्रशिक्षक केदार शहा, आदित्य मडकेकर आणि श्रीनिवास राव यांना गौरविण्यात आले.
तसेच, भिलाई येथील अखिल भारतीय आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या महिला व पुरुष संघाला प्रत्येकी 51000रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. इंडोनेशियातील सोलो येथे आशियाई शालेय क्रीडा स्पर्धेत कांस्य पटकाविणाऱ्या कृतिका छाब्रा, तेजस्वी काटे आणि प्रशिक्षक हिमांशू गोसावी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
शिष्यवृत्ती विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे:
आंतरराज्य संघ: महिला संघ: मिहिका यादव(मुंबई), ऋतुजा भोसले(पुणे), स्नेहल माने(पुणे), दक्षता पटेल(मुंबई),
पुरुष संघ: आर्यन गोवीस(मुंबई), जयेश पुंगलिया(मुंबई), कुणाल वझिरानी(मुंबई), अर्जुन कढे(पुणे);
आशियाई शालेय क्रीडा स्पर्धा: हिमांशू गोसावी(प्रशिक्षक), कृतिका छाब्रा आणि तेजस्वी काटे;
शिष्यवृत्ती विजेते खेळाडू:
कनिका वैद्य(मुंबई), सिद्धांत बांठिया(पुणे), ध्रुव सुनीश(पुणे), अथर्व शर्मा(पुणे), सालसा आहेर, प्रेरणा विचारे(मुंबई), आर्यन भाटिया(मुंबई), आदित्य बलसेकर(मुंबई), तेजस्वी मेहरा(नवी मुंबई), रिचा चौगुले(पुणे), गौरी भागिया(मुंबई), मालविका शुक्ला(मुंबई), अर्जुन गोहाड(पुणे), गिरीश चौगुले(पुणे), यशराज दळवी(पुणे), फैझ नस्यम(मुंबई), ऋतुजा चाफळकर(पुणे), सुदिप्ता कुमार(मुंबई), मानस धामणे(पुणे), प्रज्वल तिवारी(मुंबई), काहीर वारिक(ठाणे), मलिका मराठे(पुणे), मधुरिमा सावंत(पुणे), परी सिंग(पुणे), अन्या जेकब(पुणे), नील जोगळेकर(पुणे), अर्णव पापरकर(पुणे), समर्थ सहिता(मुंबई), अस्मि आडकर(पुणे), ओमी मेहता(नवी मुंबई), आकांक्षा अग्निहोत्री(पुणे).