---Advertisement---

विंडीजच्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या यशस्वीचा जबरदस्त विक्रम, रोहित-धवनसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील

Yashasvi-Jaiswal
---Advertisement---

भारतीय संघाने शुक्रवारी (दि. 14 जुलै) वेस्ट इंडिज संघाला पहिल्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 141 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह भारतीय संघाने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25मधील पहिला सामना जिंकताच भारताच्या खात्यात 12 गुणांची नोंदही झाली. विशेष म्हणजे, या सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयसवाल याने 171 धावा चोपत सामनावीर पुरस्कारही आपल्या नावे केला. यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमही नोंदवला गेला.

जयसवालचा विक्रम
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत फक्त 150 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने पहिला डाव 5 विकेट्स गमावत 421 धावांवर घोषित केला. भारताला एवढी मोठी धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा फलंदाज इतर कुणी नसून यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) होता. त्याने या सामन्यात 387 चेंडूंचा सामना केला आणि 171 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 16 चौकारांचाही पाऊस पाडला.

त्याच्या या कामगिरीमुळेच भारतीय संघाने 421 धावांचा डोंगर उभारला. तसेच, दुसऱ्या डावात यजमानांना 272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फक्त 130 धावाच करता आल्या. अशाप्रकारे भारताने हा सामना 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला. या सामन्यातील दीडशतकी खेळीमुळे जयसवालला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. अशाप्रकारे तो पदार्पणाच्या कसोटीत सामनावीर पुरस्कार जिंकणारा 8वा भारतीय खेळाडू ठरला.

त्याच्यापूर्वी असा विक्रम सर्वप्रथम 1992 मध्ये प्रवीण आमरे यांनी केला होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर 2006 मध्ये आरपी सिंग याला पाकिस्तानविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यातील कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच, 2011मध्ये आर अश्विन (R Ashwin) याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करताना हा पुरस्कार पटकावला होता. पुढे 2013 मध्ये शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध, रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेही त्याच वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध, 2018 मध्ये पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरुद्ध आणि 2021 मध्ये श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण करताना सामनावीर पुरस्कार पटकावला होता. (Yashasvi Jaiswal become 8th cricketer to won Player of the Match for India on Test debut)

कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू
प्रवीण आमरे, विरुद्ध- दक्षिण आफ्रिका (1992)
आरपी सिंग, विरुद्ध- पाकिस्तान (2006)
आर अश्विन, विरुद्ध- वेस्ट इंडिज (2011)
शिखर धवन, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया (2013)
रोहित शर्मा, विरुद्ध वेस्ट इंडिज(2013)
पृथ्वी शॉ, विरुद्ध- वेस्ट इंडिज (2018)
श्रेयस अय्यर, विरुद्ध- न्यूझीलंड (2021)
यशस्वी जयसवाल, विरुद्ध- वेस्ट इंडिज (2023)*

महत्वाच्या बातम्या-
पहिला कसोटी जिंकताच रोहितचा आनंद गगनात मावेना; म्हणाला, ‘आम्हाला माहिती होतं, एकदाच…’
अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा! 709 विकेट्स पूर्ण करत हरभजनला पछाडलं, इतर 3 विक्रमही लईच भारी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---