भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जयस्वालने इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये अप्रतिम खेळी केली आहे. चालू आयपीएल हंगामात त्याने शुक्रवारी (18 मे) आपल्या 600 धावाही पूर्ण केल्या. भारतीय संघाचे भविष्य म्हणून जयस्वाल आपली ओळख अधिकच मजबूत करत असल्याचे दिसून येत आहे.
आयपीएल 2023मध्ये जयस्वालने पहिल्या 13 सामन्यांमध्ये 8 अर्धशतक आणि 1 शतक ठोकले होते. शुक्रवारी जयस्वाल हंगामातील आपला 14 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्याने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात हंगामातील आपल्या 600 धावांचा टप्पा पार केला. सोबतच यावर्षी 600 धावा करणारा जयस्वाल आयपीएलमधील पहिला भारतीय ठरला आहे. तसेच 600 आयपीएल धावा करणारा भारताचा पहिलाच अनकॅप्ड खेळाडू तोच ठरला आहे.
वयाची 25 वर्ष पूर्ण करण्याआधी आयपीएल हंगामात 600 धावा करणाऱ्यांमध्ये जयस्वालचे नाव नव्याने जोडले गेले आहे. अशी कामगिरी आतापर्यंत एकूण चार खेळाडूंना जमली आहे. यामध्ये शॉन मार्क (2008), रिषभ पंत (2018), ऋतुराज गायकवाड (2021) आणि यशस्वी जयस्वाल (2023) या चौघांचा समावेश आहे. सोबतच जयस्वाल
वयाची 25 वर्षी पूर्ण करण्याआधी आयपीएल हंगामात 600 धावा करणारे फलंदाज
शॉन मार्श (616 धावा, 2008)
रिषभ पंत (684 धावा, 2018)
ऋतुराज गायकवाड (635 धावा, 2021)
यशस्वी जयस्वाल (620* धावा, 2023)
आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू
620 – जयस्वाल (2023)*
616 – शॉन मार्श (2008)
516 – ईशान किशन (2020)
512 – सूर्यकुमार यादव (2018)
480 – सूर्यकुमार यादव (2020)
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याच पंजाबने प्रथम फलंदाजी करत 5 बाद 187 धावा केल्या. सॅम करन, जितेश शर्मा आणि एम शाहरुख यांनी अनुक्रमे 49, 44 आणि 41 धावांची खेळी केली. (Yashasvi Jaiswal become a Most Run scorer Uncapped Batsman in an IPL Season)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लिश दिग्गज म्हणतोय, “विराटपेक्षा क्लासेनचे शतक सरस”, दिले हे कारण
VIDEO । आपल्याच चेंडूवर बोल्टने पकडला अप्रतिम झेल, शतकवीर फलंदाज स्वस्तात बाद