---Advertisement---

SMAT: यशस्वीचे खणखणीत शतक, मुंबईचा शानदार विजय, जयस्वालने पुन्हा टीम इंडियाचे दार ठोठावले

On: रविवार, डिसेंबर 14, 2025 2:30 PM
---Advertisement---

सायद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये मुंबईच्या संघाने हरियाणाचा चार विकेट्सने पराभव केला. या सामन्यात हरियाणाने प्रथम फलंदाजी करत 234 धावांचा भला मोठा स्कोअर उभारला. मात्र यशस्वी जयस्वालच्या दमदार शतकाच्या जोरावर मुंबईने हे आव्हान यशस्वीरीत्या पार केले.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून यशस्वी जयस्वाल आणि अजिंक्य रहाणे यांनी डावाची सुरुवात केली. जयस्वालने पहिल्यापासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने 202 च्या स्ट्राइक रेटने अवघ्या 50 चेंडूंमध्ये 101 धावा ठोकल्या. या खेळीत 16 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. रहाणे 21 धावांवर बाद झाला.

त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सरफराज खाननेही शानदार फलंदाजी करत 25 चेंडूंमध्ये 64 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. जयस्वाल आणि सरफराजच्या वादळी खेळीमुळे सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूने झुकला.

याआधी हरियाणासाठी कर्णधार अंकित कुमारने दमदार फलंदाजी करत 42 चेंडूंमध्ये 89 धावा केल्या. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 6 षटकार होते. निशांत संधूनेही 38 चेंडूंमध्ये 63 धावांची अर्धशतकी खेळी साकारली, तर अर्श रंगाने 26 धावा केल्या. या खेळीमुळे हरियाणाला मोठा स्कोअर उभारता आला, मात्र गोलंदाजांच्या अपयशामुळे हा स्कोअर त्यांना वाचवता आला नाही.

सध्या भारतीय टी-20 संघाबाहेर असलेला यशस्वी जयस्वाल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघात निवडला गेला नाही. त्याच्या जागी शुबमन गिलला संधी मिळाली आहे, मात्र त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. अशा परिस्थितीत जयस्वालने या सामन्यातील शतकी खेळीमुळे पुन्हा एकदा टीम इंडियाचे दार ठोठवले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---