राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर यशस्वी जयसवाल याने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत इतिहास रचला आहे. जयसवाल हा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज बनला आहे. कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स आयपीएल 2023च्या 56व्या सामन्यात आमने-सामने होते. या सामन्यात कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना 21 वर्षीय जयसवालने हा जबरदस्त विक्रम करून दाखवला. विशेष म्हणजे, त्याने पहिल्या षटकात केलेला धमाका आता सर्वत्र चर्चेत आहे. त्याने केकेआरचा कर्णधार नितीश राणा याला चांगलाच घाम फोडला.
या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट्स गमावत 149 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) उतरला होता. यावेळी केकेआरकडून डावाचे षटक टाकण्यासाठी कर्णधार नितीश राणा आला होता. राणाचा हा निर्णय जयसवालने पुरता चुकीचा ठरवला. यावेळी जयसवालने राणाच्या पहिल्या चेंडूपासून धुलाई करण्यास सुरुवात केली. जयसवालने पहिल्या दोन्ही चेंडूंवर खणखणीत दोन षटकार मारले. त्यानंतर पुढील तिसऱ्या आण चौथ्या चेंडूवरही दोन चौकार मारले. पुढे पाचव्या चेंडूवर 2 धावा घेत पुन्हा शेवटच्या चेंडूवर जबरदस्त चौकार मारला. अशाप्रकारे जयसवालने सहकारी जोस बटलर याला स्ट्राईक न देता एकट्यानेच पहिल्या षटकात 26 धावा काढल्या. यामुळे एक विक्रमही रचला गेला.
6 6 4 4 2 4 ! @ybj_19 starts his innings in style.
Live – https://t.co/jOscjlr121 #TATAIPL #KKRvRR #IPL2023 pic.twitter.com/HMuIPXbpIm
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करणारे संंघ
जयसवालच्या खेळीमुळे राजस्थान संघाच्या नावावर आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला गेला. या विक्रमाच्या यादीत आजचा सामना संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. यापूर्वी 2011मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना 7 अतिरिक्त धावांच्या मदतीने चेन्नई येथे पहिल्या षटकात सर्वाधिक 27 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2013मध्ये एक अतिरिक्त धावेच्या मदतीने केकेआरने मुंबईविरुद्ध कोलकाता येथे पहिल्या षटकात 26 धावा केल्या होत्या. तसेच, 2021मध्ये एक अतिरिक्त धावेच्या मदतीने दिल्ली कॅपिटल्सने अहमदाबाद येथे केकेआरविरुद्ध पहिल्या षटकात 26 धावा केल्या होत्या.
आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक धावा
27/0 – बेंगलोर वि. मुंबई, चेन्नई, 2011 (अतिरिक्त- 7)
26/0 – राजस्थान वि. कोलकाता, कोलकाता, 2023*
26/0 – कोलकाता वि. मुंबई, कोलकाता, 2013 (अतिरिक्त- 1)
25/0 – दिल्ली वि. कोलकाता, अहमदाबाद, 2021 (अतिरिक्त-1)
जयसवालचा विक्रम
राजस्थान रॉयल्सकडून डावाची सुरुवात करताना जयसवालने तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर 1 धाव घेत आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केले. यावेळी त्याने 13 चेंडूत 50 धावा करत अर्धशतक साकारले. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 6 चौकारांचाही पाऊस पाडला. आयपीएलमध्ये यापूर्वी सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम केएल राहुल याच्या नावावर होता. राहुलने किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून मोहालीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना 14 चेंडूत अर्धशतक केले होते. मात्र, आता हा विक्रम जयसवालने मोडला आहे. (Yashasvi Jaiswal fastest half century in 13 balls read about his first over batting against kkr captain nitish rana)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! बाऊंड्री लाईनवर धावत हेटमायरने पकडला अचंबित करणारा कॅच, व्हिडिओ पाहाच
ब्रेकिंग! चहलने रचला इतिहास, ब्रावोच्या विक्रमाला धक्का देत बनला IPLमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर