आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (27 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा 32 धावांनी दणदणीत पराभव केला. राजस्थानच्या विजयात युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याचा सिंहाचा वाटा राहिला. त्याने 77 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीनंतर बोलताना त्याने यशाचे श्रेय विराट कोहली व एमएस धोनी यांना दिले.
हंगामाच्या सुरुवातीपासून चांगल्या लयीमध्ये असलेल्या राजस्थानची लय मागील दोन सामन्यात बिघडली. त्यांना सलग दोन सामन्यात पराभूत व्हावे लागले. धावांचा पाठलाग करताना पराभूत व्हावे लागल्याने यावेळी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर जोस बटलर व यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या गड्यासाठी 8.2 षटकात 86 धावांची सलामी दिली. जयस्वाल याने एखाद्या कसलेल्या खेळाडू प्रमाणे चेन्नईच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. उत्तम जमिनीलगतचे फटके तसेच षटकार देखील ठोकत त्याने हंगामातील आपले तिसरे अर्धशतक पूर्ण केले. केवळ 43 चेंडूंवर 77 धावा करताना त्याने 8 चौकार व 4 षटकार लगावले. याच खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला,
“वर्षभर खेळत असलो तरी वेळ मिळेल तेव्हा मी एमएस धोनी, विराट कोहली यांच्यासोबत बोलत असतो. राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनातील लोक देखील मला कधीही मदत करण्यासाठी तत्पर आहेत.”
जयस्वाल याने यावर्षी आयपीएलमध्ये येण्याआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढल्या होत्या. सर्वच प्रमुख स्पर्धांमध्ये त्याच्या बॅटमधून शतके आली होती. सध्या तो 8 सामन्यांमध्ये 305 धावांसह ऑरेंज कॅप शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे.
(Yashasvi Jaiswal Gives Credit Of His Success To MS Dhoni Virat Kohli And Rajasthan Royals Management)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“रोहित मानसिकदृष्ट्या थकलाय”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितली हिटमॅनची परिस्थिती
रॉयल्सचा किल्ला भेदण्यात सीएसके पुन्हा अपयशी! शानदार विजयासह राजस्थान पुन्हा नंबर वन






