इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)च्या १५व्या हंगमाच्या प्ले-ऑफ सामन्यांना मंगळवार २४ मे पासून सुरुवात झाली. आयपीएल २०२२ चा पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघात खेळला गेला. या सामन्यांत अनेक गोष्टींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. सामन्यात जॉस बटलर (Jos Buttler), डेविड मिलर (David Miller) आणि संजू सॅमसनच्या (Sanju Samson) खेळीपेक्षाही जास्त आकर्षक क्षण ठरली तो म्हणजे यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) दाखवलेली खेळभावना. सध्या यशस्वीच्या या खेळभावनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे, सोबतंच युवा यशस्वीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक देखील होत आहे.
गुजरात विरुद्ध राजस्थानच्या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानकडून सलामीवीर म्हणून फलंदाजी करण्यासाठी जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले. सुरुवातीपासूनच यशस्वीला फलंदाजी करण्यास अवघड होत असल्याचे जाणवत होते. सामन्याच्या दुसऱ्या षटकांत शेवटच्या चेंडूवर यश दयालने टाकलेल्या चेंडूने यशस्वीच्या बॅटची अगदी अलगद कड घेतली आणि हा चेंडू सहाने कोणतीही चूक न करता झेलला.
कड इतकी अलगद होती की, अपील केल्यानंतर अंपायरदेखील सुरुवातीला संभ्रमात पडले. मात्र अपील होण्याआधीच यशस्वी पॅविलियनकडे रवाना झाला होता. यशस्वीच्या या कृत्यानंतर अंपायरच्या चेहऱ्यावरील हावभाव सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तसेच यशस्वीच्या खेळभावनेचे कौतुकही होत आहे.
https://twitter.com/Biscuit8Chai/status/1529110499123937281
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा…
दरम्यान, यशस्वी बाद झाल्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन फलंदाजीसाठी उतरला. पहिल्याच चेंडूवर षटकार मारत संजूने आपले ध्येय स्पष्ट केले. संजू आणि बटलरच्या तुफानी खेळीमुळे राजस्थानचा संघ २० षटकांत ६ बाद १८८ धावा बनवण्यास यशस्वी ठरला.
नंतर फलंदाजीला उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या डावाच्या दुसऱ्या धावात पहिल्याच षटकांत ट्रेंड बोल्टने (Trent Boult) वृद्धीमान सहाचा (Wriddhiman Saha) बळी घेतला. मात्र त्यानंतर पहिले शुभमन गिल (Dhubhman Gill), मॅथ्यू वेड (Matthew Wade) आणि त्यानंतर हर्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि डेविड मिलरच्या जोरावर गुजरातने ७ विकेट्स आणि ३ चेंडू राखत विजय मिळवून थेट अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
असं काय घडलं? पंड्या, बटलर आणि मिलर पेक्षा जास्त गाजला युवा यशस्वी जयस्वाल; पहा व्हिडिओ…
Qualifier 1 | डेविड मिलरची ‘किलर’ खेळी! माजी टीमला रडवलं अन् गुजरातला थेट फायनलमध्ये पोहोचवलं
‘भारताचे गॅरी सोबर्स’ अशी ओळख मिळवणारे दिग्गज, २६ सामन्यांच्या कारकिर्दीत रचला होता विक्रमांचा ढीग