---Advertisement---

यशस्वी जयस्वालने मोडला 45 वर्षे जुना रेकॉर्ड, याबाबतीत कोहलीसह दिग्गजांना टाकले मागे

On: शनिवार, ऑक्टोबर 26, 2024 2:23 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्याच्या मैदानावर खेळला जात आहे. ज्यामध्ये खेळाच्या तिसऱ्या दिवशी किवी संघ आपल्या दुसऱ्या डावात 255 धावांवरच मर्यादित होता. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला चौथ्या डावात 359 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने तिसऱ्या दिवसाच्या खेळात शानदार कामगिरी केली. ज्यात त्याने घरच्या मैदानावर एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला आहे. तसेच त्याने भारतासाठी 77 धावांच्या खेळीत केला 45 वर्षांचा विक्रम मोडला.

भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे. तर याआधी हा विक्रम गुंडप्पा विश्वनाथच्या नावावर होता. ज्यांनी घरच्या मैदानावर वर्ष 1979 मध्ये13 कसोटी सामने खेळले होते. ज्यात 61.58 च्या सरासरीने एकूण 1048 धावा केल्या होत्या. तर यशस्वी जयस्वालने त्यांना मागे टाकले आहे. जयस्वालने 2024 मध्ये घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये 66 च्या उत्कृष्ट सरासरीने 1056 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने त्याच्या 2 शतके आणि 7 अर्धशतकही झळकावले. आता जयस्वालचे हे आकडे नक्कीच वाढतील कारण भारतीय संघाला या कसोटी मालिकेतील अजून एक सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. तसेच भारताला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दाैरा करायचा आहे.

भारतासाठी एका वर्षात घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी धावा करणारे खेळाडू

यशस्वी जयस्वाल – 1056 धावा (2024)

गुंडप्पा विश्वनाथ – 1047 धावा (1979)

विराट कोहली – 964 धावा (2016)

विराट कोहली – 898 धावा (2017)

दिलीप वेंगसरकर – 875 धावा (1987)

सुनील गावस्कर – 865 धावा (1979)

हेही वाचा-

पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, या विक्रमाबद्दल तुम्हीही जाणून घ्या!
बाबर आझमला ड्रॉप करताच पाकिस्ताननं जिंकली कसोटी मालिका, इंग्लंडचा दारूण पराभव
रवींद्र जडेजानं रनआऊट करताना दाखवली ‘धोनी’ सारखी हुशारी, कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल; VIDEO पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---