भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने बांंग्लादेशविरुद्ध चमकदार कामगिरी केली. यशस्वीने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकीर्दीतील बांंग्लादेशविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली. ज्यामध्ये त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. दरम्यान आता आयसीसी टेस्ट रँकिंगच्या ताज्या आकडेवारीनुसार जयस्वालला मोठा फायदा झाला आहे. आयसीसीने बुधवारी 02 ऑक्टोबर रोजी क्रमवारी जाहीर केली. ज्यामध्ये यशस्वी सह विराट कोहलीला देखील या रँकिंगमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे.
बांग्लदेशविरुद्ध कसोटी मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीचा फायदा यशस्वी जयस्वालला झाला आहे. त्याने आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये मध्ये दोन स्थांनाची झेप घेत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. यशस्वी जयस्वालच्या खात्यात 792 रेटींग्स आहेत. त्याच्या समोर जो रुट आणि केन विल्यम्सन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्यानी विराजमान आहेत. रुटच्या खात्यात 899 तर न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराच्या खात्यात 829 रेटींग्स आहेत. या दरम्यान भारतीय संघाचा किंग विराट कोहलीला देखील मोठा फायदा झाला आहे. तो सहा स्थानांची झेप घेत रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात 724 रेटींग्स आहेत.
YASHASVI JAISWAL MOVES TO THIRD IN ICC TEST BATTERS RANKING 🇮🇳
– Jaiswal is here to rule in Test cricket. pic.twitter.com/xp96u40abN
— Johns. (@CricCrazyJohns) October 2, 2024
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटीच्या ताज्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये भारताचे तीन फलंदाज आहेत. यशस्वी जयस्वाल विराट कोहली आणि रिषभ पंत या तिंघांचा समावेश आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची मात्र घसरण पाहयला मिळाली. तो तीन स्थानांनी घसरुन नवव्या क्रमांकावर पोहचला आहे. पंतच्या खात्यात 710 रेटींग्स आहेत.
VIRAT KOHLI MOVES TO SIXTH IN ICC TEST BATTERS RANKING 🐐
– GOAT is coming for the Top position. pic.twitter.com/7k8K1GJkjQ
— Johns. (@CricCrazyJohns) October 2, 2024
आयसीसी नवीनतम कसोटी फलंदाजी क्रमवारी (टाॅप-6)
1) जो रूट
२) केन विल्यमसन
3) यशस्वी जयस्वाल
4) स्टीव्ह स्मिथ
5) उस्मान ख्वाजा
6) विराट कोहली
हेही वाचा-
जसप्रीत बुमराहचा मोठा धमाका, कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप! टॉप 5 गोलंदाज जाणून घ्या
रोहित शर्माच्या या ‘मास्टरप्लॅन’मुळे बांगलादेशचा पराभव, अश्विननं उघड केलं रहस्य
टी20 मालिकेपूर्वी यष्टीरक्षकाची जबरदस्त तयारी, राहुल द्रविडकडून खास प्रशिक्षण