भारतात सध्या रणजी ट्रॉफी २०२१-२२ हंगामातील उपांत्य फेरी सामने सुरू आहेत. यातील दुसरा उपांत्य फेरी सामना मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्या बेंगलोर येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवसापर्यंत मुंबई संघाने सामन्यातील त्यांची पकड मजबूत केली आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबईने एका विकेटच्या नुकसानावर १३३ धावा केल्या होत्या आणि ३४६ धावांची आघाडी घेतली आहे. या डावात मुंबईचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल त्याच्या पहिल्या धावेसाठी संघर्ष करताना दिसला.
पहिल्या डावात २१३ धावांची आघाडी घेतल्यानंतप मुंबईकडून (Mumbai vs Uttar Pradesh) जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि कर्णधार पृथ्वी शॉ सलामीला फलंदाजीसाठी आले होते. पृथ्वी शॉने संघाला विस्फोटक सुरुवात करून दिली. परंतु जयस्वालने बचावात्मक खेळी केली. त्याने तब्बल ५४ चेंडूंचा सामना केल्यानंतर पहिली धाव (Yashasvi Jaiswal First Run) काढली.
जयस्वालच्या या खेळीने अनेकांना भारताचा अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजाराची आठवण झाली. पुजाराने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात ५४ चेंडू खेळल्यानंतर (Yashasvi Jaiswal Faced 54 Balls) आपले खाते उघडले होते.
जयस्वालला पहिला धाव काढण्यासाठी इतके झगडताना पाहून उत्तर प्रदेश संघासह मुंबई संघाच्या खेळाडूंनाही हसू आवरले नाही. डगआऊटमध्ये बसून सामना पाहात असलेल्या मुंबईच्या खेळाडूंनी जयस्वालने पहिली धाव काढल्यानंतर उठून टाळ्या वाजवल्या. तसेच जयस्वालनेही आपली बॅट हवेत उंचावत त्यांचे असे अभिवादन केले, जणू त्याने शतक पूर्ण केले आहे.
…but most importantly he got the team’s back. 👊💗 pic.twitter.com/ZEaQL9LzOT
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) June 16, 2022
दरम्यान भलेही दुसऱ्या डावात जयस्वाल पहिली धाव करण्यासाठी संघर्ष करताना दिसला असला तरीही, पहिल्या डावात मात्र त्याने धडाकेबाज शतक केले होते. पहिल्या डावात त्याने २२७ चेंडू खेळताना १५ चौकारांच्या मदतीने १०० धावांची खेळी केली होती. त्याच्याबरोबरच यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरे यानेही ११५ धावांच्या खेळीचे योगदान देत मुंबईला ३९३ धावांपर्यंत पोहोचवले होते. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशचा संघ १८० धावांवरच सर्वबाद झाला.
आता दुसऱ्या डावातही मुंबईचा संघ भक्कम स्थितीत दिसत आहे. कर्णधार पृथ्वी शॉ ६४ धावा करून बाद झाला आहे. जयस्वाल (८६ धावा) आणि अरमान जाफर (८२ धावा) फलंदाजी करत असून दोघेही शतकी खेळीच्या नजीक आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिडामंत्र्याचे भर मैदानातच उतू गेले प्रेम, लव्ह लेटर दाखवत पत्नीसाठी केले हटके सेलिब्रेशन
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी२० सामना होऊ शकतो रद्द? हे आहे मोठे कारण
आठवणीतील सामना: २३ वर्षांपूर्वी झाला होता क्रिकेट विश्वचषकातील सर्वात रोमांचकारी सामना, पाहा व्हिडिओ