भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार यशस्वी जयस्वालनं आतापर्यंतच्या आपल्या छोटेखानी कारकिर्दीत धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यानं केवळ 9 कसोटींमध्ये 1000 धावा ठोकल्यात. यासह तो डॉन ब्रॅडमननंतर सर्वात कमी सामन्यांमध्ये हजार धावांचा आकडा गाठणारा फलंदाज बनला आहे.
यशस्वी केवळ धावाच बनवत नाही तर तो त्याच्या आक्रमक फलंदाजीनं विरोधी संघाला धडकी भरवतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग यासारख्या दिग्गजांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत जेवढे षटकार मारता आले नाही, तेवढे षटकार या 22 वर्षीय फलंदाजानं केवळ 9 कसोटींमध्ये मारले आहेत!
यशस्वी जयस्वाल आपल्या कसोटी कारकिर्दीचा नववा सामना खेळत आहे. त्यानं आपल्या 9 व्या कसोटी सामन्याच्या 16 व्या डावात एक हजार धावा पूर्ण केल्या. यशस्वी पहिल्याच चेंडूपासून चौकार आणि षटकार मारण्यावर विश्वास ठेवणाऱ्या जगातील मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. यामुळेच त्यानं केवळ 9 कसोटीत 29 षटकार ठोकले. यशस्वीनं इंग्लंडविरुद्ध धरमशाला येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 3 षटकार ठोकले. ही त्याच्या प्रत्येक सामन्यात मारलेल्या षटकारांची सरासरी आहे.
विशेष म्हणजे विराट कोहली, सुनील गावसकर, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, रवी शास्त्री, गौतम गंभीर, केएल राहुल, शिखर धवन यांसारख्या मातब्बर खेळाडूंना त्यांच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत यशस्वी इतके षटकार मारता आलेले नाहीत. विराट कोहली आणि सुनील गावसकर यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत 26-26 षटकार मारले आहेत. केएल राहुलनं 24, युवराजनं 22, रवी शास्त्रीनं 22, द्रविडनं 21 आणि अहरुद्दीननं 19 षटकार मारले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवननं 12 षटकार तर गौतम गंभीरनं 10 षटकार मारलेत. तर व्हीव्हीएस लक्ष्मणनं त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत केवळ 5 षटकार मारले आहेत.
सर्वाधिक षटकार मारण्याचा विचार केला तर हा विक्रम सध्याचा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावावर आहे. त्यानं आतापर्यंत 128 षटकार मारले आहेत. सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवाग सहाव्या स्थानावर आहे. त्यानं 104 कसोटीत 91 षटकार मारले आहेत.
भारतीय संघ 92 वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. आतापर्यंत 314 भारतीय क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेट खेळलं. 14 क्रिकेटपटूंनी 100 हून अधिक कसोटी सामने खेळलेत. मात्र त्यापैकी फक्त 12 जण आहेत ज्यांनी यशस्वीपेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
महिला क्रिकेटची सुपरस्टार हरमनप्रीत कौरचा आज वाढदिवस, विराट-धोनी नाही तर ‘या’ खेळाडूला मानते आदर्श
टीम इंडियानं इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवलं, देवदत्त पडिक्कलचं पदार्पणातच अर्धशतक
टीम इंडियानं इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवलं, देवदत्त पडिक्कलचं पदार्पणातच अर्धशतक