---Advertisement---

मोठी बातमी! यशस्वीने सोडली मुंबई, आता ‘या’ शहरात होणार स्थायिक!

On: बुधवार, एप्रिल 2, 2025 2:17 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वालबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशस्वी जयस्वालने स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचा निरोप घेतला असून, तो आता गोव्याकडून खेळण्यास तयार आहे. 2025-26 च्या देशांतर्गत हंगामात तो गोव्याचे नेतृत्व करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Yashasvi Jaiswal switches state teams Mumbai to Goa)

जयस्वालने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) ईमेल लिहून पुढील हंगामापासून त्यांचा राज्य संघ मुंबईहून गोव्यात बदलण्यासाठी ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (NOC) मागितली आहे. या निर्णयामुळे जयस्वाल आता गोव्याकडून रणजी ट्रॉफी आणि अन्य देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळताना दिसणार आहे. असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. शिवाय तो गोव्यामध्येच स्थायिक होण्याची शक्यता आहे.

जयस्वाल हा सध्या भारतीय संघाचा महत्त्वाचा युवा फलंदाज आहे. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, नव्या संधीसाठी त्याने गोव्याचा मार्ग स्वीकारला आहे. गोव्याचा संघ सध्या पुनरबांधणीच्या टप्प्यात असून, जयस्वालच्या समावेशामुळे संघ अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे.

या बाबत आधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जयस्वालच्या आगमनाने गोव्याच्या संघाची फलंदाजी विभागात मजबुती येणार असून, आगामी हंगामात त्याचा प्रभावी खेळ पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---