---Advertisement---

पाकिस्तान विरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर यशस्वी जयस्वाल म्हणाला…

On: बुधवार, फेब्रुवारी 5, 2020 12:48 PM
---Advertisement---

काल (4 फेब्रुवारी) पोचेफस्टरूम (Potchefstroom) येथे 19 वर्षाखालील विश्वचषकात 19 वर्षाखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षाखालील पाकिस्तान संघ (Under-19 Team India vs Pakistan) यांच्यात उपांत्य सामना पार पडला. हा सामना भारताने 10 विकेट्सने (Won By 10 Wickets) जिंकला. तसेच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (In Final) प्रवेश केला आहे.

या सामन्यात सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने नाबाद शतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 113 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 105 धावा केल्या. या सामन्यानंतर यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) सामन्यानंतर आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी तो म्हणाला की, माझं विश्वचषकात शतक करण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

“हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्याप्रमाणे आहे. मी माझ्या देशासाठी जे काही केले, त्यासाठी मी खूप आनंदी आहे. मी हे शब्दात सांगू शकत नाही. मी पाकिस्तान विरुद्ध विश्वचषकात शतक केले, ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही,” असे सामन्यानंतर जयस्वाल म्हणाला.

त्याचबरोबर जयस्वालसोबत संघसहकारी दिव्यांश सक्सेनाने (Divyansh Saxena) नाबाद 59 धावांची अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. यावेळी जयस्वाल म्हणाला की, “ही तर आता सुरुवात आहे. मला भविष्यात खूप मेहनत घ्यायची आहे. मी आणि सक्सेना बोलत होतो की आपल्याला विकेट घालवायची नाही.”

“पाकिस्तानने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. यानंतर आम्हाला सांभाळून खेळावे लागले,” असेही जयस्वाल यावेळी म्हणाला.

आता 6 फेब्रुवारीला 19 वर्षांखालील न्यूझीलंड विरुद्ध 19 वर्षांखालील बांगलादेश संघात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल त्या संघाविरुद्ध भारतीय संघ 9 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळेल.

https://twitter.com/Maha_Sports/status/1224698739169755136

https://twitter.com/Maha_Sports/status/1224684428082855937

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---