श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटी सामन्याच्या श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या यासिर शाहने ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नची आठवण करून दिली आहे.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शाह (Yasir Shah) याने टाकलेल्या एका चेंडून १९९०मध्ये शेन वॉर्न (Shane Warne) याने टाकलेल्या चेंडूची आठवण आली आहे. शाहने सोमवारी (१८ जुलै) कुशल मेंडिस (Kushal Mendis) याला बाद करण्यासाठी वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ सारखा चेंडू टाकला आहे. शाहने मोठ्या काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्याने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानसाठी कसोटी सामना खेळला होता.
वॉर्नने १९९०च्या ऍशेस मालिकेत माईक गॅटींगला बाद करत क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम चेंडू टाकला होता. त्याला चाहते आजही बॉल ऑफ द सेंचुरीच्या नावानेच ओळखतात. आता ३२ वर्षानंतर शाहने तसाच चेंडू टाकला आहे. त्याने टाकलेला चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर जात फलंदाज मेंडीस त्रिफळाचीत झाला आहे. त्याचबरोबर वॉर्नला शाहची गोलंदाजी फार आवडायची. त्याने शाहच्या गोलंदाजीचे कौतुकही केले होते.
Ball of the Century candidate❓
Yasir Shah stunned Kusal Mendis with a stunning delivery which reminded the viewers of Shane Warne’s ‘Ball of the Century’.#SLvPAK pic.twitter.com/uMPcua7M5E
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 18, 2022
तत्पूर्वी श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी आणि हसन अली यांच्यापुढे यजमान संघ ढासळला. अफ्रिदीने ४ विकेट्स तर अलीने २ त्यातील दिनेश चंडीमल ही महत्वाची विकेट घेतली. चंडीमलने केलेल्या ७६ धावांमुळे श्रीलंकेचा पहिला डाव २२२ धावांतच आटोपला. तर पाकिस्तानचा संघही २१८ धावांतच गारद झाला. यावेळी कर्णधार बाबर आझमने ११९ धावा केल्या.
यजमान संघाने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत मोठी आघाडी घेतली. यामध्ये ओशाडा फर्नांडोने ६४, कुशल मेंडीसने ७६ आणि चंडीमलने नाबाद ९४ धावा केल्याने श्रीलंकेने दुसऱ्या डावात ३३७ धावा केल्या. मोहम्मद नवाजने ५ तर यासिर शाहने ३ विकेट्स घेतल्या.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला असता पाकिस्तानचा दुसरा डाव सुरू असून सलामीवीर अब्दुल्लाह शफिक ११२ धावा आणि मोहम्मद रिजवान ७ धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत. तसेच बाबरने ५५ धावा केल्या असून त्याल प्रबत जयसूर्याने त्रिफळाचीत केले आहे. संघाने ३ विकेट्स गमावत २२२ धावा केल्या असून १२० धावांनी ते मागे आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुजाराने रचला इतिहास! इंग्रजांच्या भूमीवरच करतोय काउंटी संघाचे नेतृत्व
वाढदिवस विशेष: विश्वचषक १९८३ स्पर्धेतील दुर्लक्षित नायक, ज्याने कैफ, युवराजलाही दिले होते प्रशिक्षण
ENGvsIND: रिषभ पंतच्या त्या ‘थम्स अप’ इशाऱ्यामागचे रहस्य अखेर उलगडले, व्हिडिओ जोरदार व्हायरल