ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांचा बोलबाला होता. भारतीय गोलंदाजांच्या तोफखान्यासमोर इंग्लिश फलंदाजांचा काही निभाव लागला नाही. कर्णधार जो रुटला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करण्यात यश आले नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने जेम्स अँडरसनला टाकलेल्या अप्रतिम चेंडू टाकत बाद केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला गेल्या काही महिन्यांपासून गडी बाद करण्यात अडचणीचा सामना करावा लागत होता. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. परंतु इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने ४ गडी बाद करत जोरदार पुनरागमन केले आहे.
इंग्लंड संघाचा ११ व्या क्रमांकावरील फलंदाज जेम्स अँडरसनला बाद करण्यासाठी जसप्रीत बुमराहला जास्त वेळ लागला नाही. पहिल्या डावातील ६६ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह आला होता. या षटकातील चौथा चेंडू जसप्रीत बुमराहने असा काही यॉर्कर चेंडू टाकला, जो जेम्स अँडरसनला कळालाच नाही आणि तो १ धावेवर त्रिफळाचित बाद होऊन माघारी परतला. अँडरसनची विकेट गेल्यानंतर बुमराहच्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासारखे होते.
अँडरसनच्या रुपात दहावी विकेट गेल्यानंतर इंग्लंड संघाचा डाव अवघ्या १८३ धावांवर संपुष्टात आला. (Yorker ball Bowled by jasprit bumrah to clean bowled James Anderson,watch video)
https://twitter.com/TheNameIsSK55/status/1422963832910090246?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1422963832910090246%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fjasprit-bumrah-vs-james-anderson-lbw-drama-and-bowled-video-eng-vs-ind-80888
भारतीय फलंदाजांची संयमी सुरुवात
भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाचा डाव अवघ्या १८३ धावांवर गुंडाळला. त्यानंतर आता भारतीय फलंदाजांवर संघाला चांगल्या स्थितीत पोहचवण्याची जबाबदारी असणार आहे. या सामन्यात मयंक अगरवालच्या अनुपस्थित केएल राहुलला डावाची सुरुवात करण्याची संधी देण्यात आली आहे. पहिल्या दिवसाच्या अखेर भारतीय संघाला ० बाद २१ धावा करण्यात यश आले आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मा हे दोघेही प्रत्येकी ९-९ धावांवर फलंदाजी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
शमीची बालिश चूक, बेयरस्टोला धावबाद करण्याची संधी असताना दुसऱ्याच बाजूला फेकला चेंडू
टीम इंडियाच्या तोफखान्याकडून इंग्लंडचा आख्खा संघ गारद! पाहा प्रत्येक विकेट्स
‘पंतने सॅम करनचे गॉगल चोरले?’ रिषभच्या ‘त्या’ गॉगल्सचीच सगळीकडे चर्चा