जगभरातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, सध्या खेळाडू खेळाच्या मैदानाऐवजी सोशल मीडियावर बरेच सक्रिय झाले आहेत. दरम्यान, खेळाडू आपल्या सहकारी खेळाडूंबरोबर विनोद करतानाही दिसतात. या यादीत भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांचेही नाव आहे.
बुधवारी जडेजाने(Ravindra Jadeja) आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून कर्णधार कोहलीसोबतचा(Virat Kohli) एक फोटो शेअर केला. आणि कॅप्शनमध्ये किंग कोहलीबरोबर मजा करण्याचा प्रयत्न केला,पण त्याचे हे प्रयत्न त्याच्यावरच भारी पडले.
जडेजाला कोहलीने आपल्या उपस्थितीत फक्त गप्प केलं नाही. तर ट्रोलही केलं. जडेजाने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंट वरून फोटो शेअर करत,कॅप्शनमध्ये लिहलं होत.”देखो भाई, मैने नही बोला हैं, रिव्यूलेने को” या पोस्ट मध्ये त्याने हॅशटॅग-डीआरएसचा वापर करून कोहलीला टॅग केलं आहे.
कोहलीने या पोस्टमध्ये हसणाऱ्या इमोजी बरोबर कमेंट करत जडेजाला ट्रोल केलं.त्याने लिहलं.”तुला तर कायमच बाद वाटत असतं, पण रिव्यू घेतल्यानंतरच तुला सर्व शंका येतात”.
जडेजाने या गोष्टीला इथंच नाही सोडलं. आणि प्रत्युत्तर देत.लिहलं आता १५ सेकंदानंतर सांगेन.
https://www.instagram.com/p/CBPhXohDjjP/
महत्त्वाचे म्हणजे भारतीय कर्णधार कोहली हा एक खेळाडू म्हणून खूप हुशार होता.पण आता तो नेहमीच डीआरएस प्रकरणात चुका करतो. आणि त्यामुळे आपला रिव्यू वाया घालवत असतो.
जडेजाच्या या पोस्टवर माईकल वॉन(Michael Vaughan) यांनीही कमेंट केली आहे. त्यात त्यांनी जडेजाच्या दाढीची स्तुती करत लिहलं, “तुम्हारी दाढी काफी बेहतर है रॉकस्टार”.