कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरला आहे. त्यामुळे आता या व्हायरसला नष्ट करण्यासाठी जगभरातील अनेक दिग्गज आपल्या परीने मदत करत आहेत. भारतातही असंच काहीसं पहायला मिळत आहे.
भारतातील अनेक दिग्गज सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि अनेकजण कोरोना व्हायरसविरुद्धच्या (Corona Virus) लढाईत आपापले योगदान देत आहेत. यामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी ३ कोटी रुपयांची मदत केली आहे.
विराट आणि अनुष्काची जोडी ही क्रिकेट जगतातील सर्वात प्रसिद्ध जोडींपैकी (Popular Couple) एक आहे. या दोघांच्या जोडीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. म्हणजेच विराटने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील खास नाव कमावले आहे आणि अनुष्काने बॉलिवूड जगतात नावलौकिकता मिळविली आहे.
विराट सध्याचा कसोटी आणि वनडे क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. तसेच या पिढीतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणूनही विराटला ओळखले जाते. तर अनुष्काला चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखले जाते.
इतकेच नव्हे तर विराट आणि अनुष्काचा देशातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटीजमध्ये समावेश होतो. तरीही विराटच्या कमाईपुढे अनुष्काची कमाई कमी असली तरी या जोडीकडे खूप पैसे आहेत. विराटने नुकत्याच २०१९च्या फोर्ब्स सेलिब्रिटी १०० च्या यादीत अव्वल क्रमांक पटकाविला. तर अनुष्का २१ व्या क्रमांकावर विराजमान होती. जीक्यू इंडियाने नुकत्याच या जोडीच्या संपत्तीचा खुलासा केला आहे.
अहवालानुसार, विराटने मागील वर्षी २५२.७२ कोटी रुपयांची कमाई केली होती. विराटकडे एकूण ९०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर दुसरीकडे अनुष्काने २०१९मध्ये २८.६७ कोटी रुपयांची कमाई केली होती. अनुष्काकडे ३५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. अशाप्रकारे विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
विराटच्या कमाईचे स्त्रोत पाहिले तर विराट क्रिकेट आणि जाहिरातींच्या मदतीने खूप सारे रुपये कमावतो. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा भाग होण्यासाठी त्याची फी १७ कोटी रुपये इतकी आहे. यामुळे तो आयपीएलमधील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. याव्यतिरिक्त बीसीसीआयने विराटचे वार्षिक मानधन ७ कोटी ठेवले आहे. तसेच विराट मिंत्रा, उबर, ऑडी, एमआरएफ, मान्यवर आणि टिसोट या ब्रँड्सची जाहिरात करतो.
प्यूमा ब्रँड हा विराटसाठी भाग्यवान असल्याचे सिद्ध झाले आहे. प्यूमाने विराटसोबत १०० कोटी रुपयांचा करार केला आहे. याव्यतिरिक्त विराटकडे २ हॉटेल्सही आहेत.
दुसरीकडे अनुष्का प्रत्येक चित्रपटासाठी १२-१५ कोटी रुपये घेते. तिने आतापर्यंत १९ चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुष्काचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊसही आहे. ज्याला क्लिन स्लेट फिल्म्स असेही म्हटले जाते. हे प्रॉडक्शन हाऊस अनुष्काने २०१४ मध्ये आपल्या भावाबरोबर सुरु केले होते.
याव्यतिरिक्त अनुष्का मान्यवर, मिंत्रा, शाम स्टील, रजनीगंधा, लवी, कॉक्स एन किंग्स, नेविया, पँटीन, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, गुगल पिक्सल आणि ऍले १८ यांसारख्या ब्रँडच्या जाहिराती करते. अनुष्काने नूश या नावाने स्वत:चा फॅशन लेबलही बनवले आहे.
विराट आणि अनुष्का अनेक महागड्या रियल इस्टेट संपत्तीचे मालकही आहेत. २०१७मध्ये लग्न झाल्यानंतर दोघेही आपल्या मुंबईच्या वरळीमधील भव्य घरामध्ये रहायला गेले होते. या घराची किंमत ३४ कोटी रुपये इतकी आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तुम्हाला माहित आहे का? वसिम अक्रमने फलंदाजीत पाॅटींग-तेंडूलकरलाही टाकले आहे मागे
-ज्या क्रमांकाची जर्सी घातलो, तेवढेच लाख रोहितने दिले पंतप्रधान सहाय्यता निधीला
-लाॅकडाऊनमध्येही या खेळाडूंना जायचं आहे घराबाहेर, हे आहे कारण