भारत आणि बांगलादेश संघात चेन्नईच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) विश्वविक्रम केला. सर्व दिग्गजांना एका फटक्यात मागे टाकून त्याने ही कामगिरी केली. जयस्वालने पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. शानदार अर्धशतकासह त्याने उत्कृष्ट विश्वविक्रमला गवसणी घातली.
कर्णधार रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) सलामीला आलेल्या जयस्वालने 118 चेंडूंचा सामना करत 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. दरम्यान त्याने 9 चौकार लगावले होते. सतत पडणाऱ्या विकेट्समध्ये जयस्वालने एक बाजू पकडली होती. मात्र, त्याच्यानंतर अश्विन आणि जडेजाने भारताला 376 धावांपर्यंत पोहोचवले. या अर्धशतकासह जयस्वाल घरच्या मैदानावर पहिल्या 10 डावात सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज बनला आहे.
यशस्वी जयस्वालने (Yashasvi jaiswal) सर्व दिग्गजांना मागे टाकून हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. जयस्वालने पहिल्या 10 कसोटी डावात 768 धावा केल्या. यंदा इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत त्याने जबरदस्त फॉर्म दाखवत 700 हून अधिक धावा केल्या होत्या. मालिकेत 700 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज ठरला होता.
घरच्या मैदानावर पहिल्या 10 डावांनंतर सर्वाधिक कसोटी धावा- 768 धावा – यशस्वी जयस्वाल (भारत), 747 धावा – जॉर्ज हॅडली (वेस्ट इंडिज), 743 धावा – जावेद मियांदाद (पाकिस्तान), 687 धावा – डेव्ह हॉटन (झिम्बाब्वे), 680 धावा – व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडिज)
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय कर्णधाराने मागितली सिराजची माफी, कारण काय?
आकाश दीपच्या वेगानं बांगलादेशी फलंदाज हादरले, प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलची प्रतिक्रिया व्हायरल
टीम इंडियानं वाजवला बांगलादेशचा बँड, दोन सेशन्समध्ये संपूर्ण टीम ऑलआऊट






