इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 24वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. चेन्नई सुपर किंग्स संघात सोमवारी (दि. 17 एप्रिल) पार पडला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडलेला हा सामना चेन्नईने 8 धावांनी जिंकला. बेंगलोर आणि चेन्नई संघांचा चाहतावर्ग प्रचंड आहे. याचा प्रत्ययदेखील या सामन्यात आला. एमएस धोनी याचा एक चाहता त्याला पाहण्यासाठी न्यूयॉर्कहून पोहोचला होता, तर एक चाहता विराट कोहली याला पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाहून आला होता. या सर्वांमध्ये एक चाहता असाही होता, जो विराट अन् धोनीचाही चाहता नव्हता. तो विराट कोहलीची मुलगी वामिका हिचा चाहता होता.
खरं तर, बेंगलोर विरुद्ध चेन्नई (Bangalore vs Chennai) सामन्यादरम्यान एक लहान मुलगा प्लेकार्ड घेऊन दिसला. त्यावर लिहिले होते की, “विराट अंकल, मी वामिकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का?” यानंतर या चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मात्र, अनेक युजर्सला ही पद्धत आवडली नाही. त्यांनी या चाहत्याच्या आई-वडिलांना चांगलेच सुनावले.
युजरचा संताप
एका युजरने हा फोटो शेअर करत लिहिले की, “मी जर वामिकाची पालक असते, तर मला खूपच राग आला असता. पालकांनो सोशल मीडियाचा हा अतिरेक थांबवा. बाळ नाही, पण तुम्ही खूपच भीतीदायक आहात.”
I would be very very angry if I was Vamika’s parents!
Also parents stop with this social media obsession! Not the child but you are creepy pic.twitter.com/grOthsNK1q
— Dr Pooja Tripathi (@Pooja_Tripathii) April 18, 2023
लेकीविषयी संवेदनशील विराट आणि अनुष्का
विशेष म्हणजे, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Kohli And Anushka Sharma) त्यांची मुलगी वामिका (Vamika) हिच्याविषयी खूपच संवेदनशील आहेत. हे जोडपे सोशल मीडियावर कधीही आपल्या मुलीचा चेहरा दाखवत नाहीयेत. इतकेच नाही, तर विमानतळावरही विराट फोटोग्राफरला वामिकाचा फोटो काढू नका सांगतो.
आयपीएल 2023मधील बेंगलोरच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर संघाने 5 सामने खेळले असून त्यातील फक्त 2 सामने जिंकले आहेत. तसेच, 3 सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. बेंगलोरचा पुढील सामना 20 एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्ध खेळला जाणार आहे. (young fan came to an ipl match with a placard asking virat kohlis daughter vamika for a date read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामन्यापूर्वी वडील सचिनने दिलेल्या टिप्सचा अर्जुनकडून खुलासा, म्हणाला, ‘आम्ही रणनीती…’
‘या’ युवा खेळाडूचे नशीब फळफळणार! हैदराबादविरुद्धची कामगिरी पाहून रोहितही म्हणाला, ‘तो लवकरच…’