क्रीडाविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. बस अपघातात एका नवोदित कबड्डीपटूचे निधन झाले आहे. शुक्रवारी (दि. 13 जानेवारी) नाशिक येथे बस अपघातात 17 वर्षीय दिक्षा गोंधळी हिने प्राण गमावले आहे. चिमुकली दिक्षा तिच्या आई-वडिलांसोबत शिर्डीला गेलेली. मात्र, काळाने तिच्यावर घाला घातला. दुर्दैवी बाब अशी की, ज्या बसचा अपघात झाला, त्यामधून दिक्षा तिच्या आई- वडिलांसोबत प्रवास करत होती. या अपघातात दिक्षाची आईदेखील दुखापतग्रस्त झाली आहे.
दिक्षा गोंधळी (Diksha Gondhali) हिची बहीण समीक्षाला क्लासला सुटी नसल्यामुळे ती शिर्डीला जाऊ शकली नव्हती. यामुळे सुदैवाने तिचा जीव वाचला.
दिक्षाबद्दल बोलायचं झालं, तर ती कल्याण येथील चिंचपाडा येथे तिच्या कुटुंबीयांसोबत राहत होती. तिचे चुलते मोरीवाला या गावात राहतात. त्यांच्या कुटुंबासोबत दिक्षा तिच्या आई-वडिलांसोबत शिर्डीला गेलेली. दरवर्षी तिचे कुटुंब शिर्डीला जातात. दिक्षा डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेजमध्ये 11वीमध्ये शिकत होती. तिच्या मित्रमंडळींनी सांगितेल की, दिक्षा कॉलेजमध्ये कबड्डी आणि शॉर्ट बॉल खेळात सहभागी व्हायची. तिचे वडील ठाण्यातील एका खासगी कंपनीमध्ये काम करायचे.
दुर्दैवी बाब अशी की, दिक्षाच्या चुलतीलाही या अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. त्यांचं वय 45 वर्षे होतं. दिक्षाच्या निधनानंतर कल्याणमध्ये शोककळा पसरली आहे. कल्याणपूर्वचे शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिक्षाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच, त्यांचे सांत्वन केले.
खरं तर, अंबरनाथहून 725 भाविकांना घेऊन 15 बसेस शिर्डीसाठी रवाना झालेल्या. यामधील एका बसचा दुर्दैवी अपघात झाला. त्यातील 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. (young kabbadi player diksha gondhali death in accident know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खासदार कबड्डी चषक | रत्नदिप, श्री शंभूराजे यांच्यात अंतिम लढत
खासदार चषक कबड्डी | रत्नदिप, माऊली, शंभूराजे, संभाजी संघांची विजयी सलामी