बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी (६ ऑगस्ट) पुन्हा एकदा भारतीय कुस्तीपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. सलग दुसऱ्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण आपल्या नावे केली. अनुभवी रवी दहिया व विनेश फोगट यांच्यानंतर १९ वर्षीय युवा कुस्तीपटू नवीन कुमार याने ७४ किलो ग्रॅम वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
Congratulations to India’s young and energetic wrestler, Naveen Kumar for winning the Gold Medal at the Birmingham Ganes. His stupendous performance has made the entire country extremely proud. Wishing him success in his future endeavours. pic.twitter.com/orIKtzidWg
— Rajnath Singh (मोदी का परिवार) (@rajnathsingh) August 6, 2022
नवीनचा अंतिम फेरीत पाकिस्तानच्या ताहिरसोबत सामना झाला. ताहिरने नवीनच्या विरोधात लेग अटॅक करत सुरुवात केली. नवीननेही तसाच प्रयत्न केला. मात्र, ताहिरने हुशारीने त्याचा पाय वाचवला. लॅग अटॅक हीच या दोघांची ताकद आहे. दरम्यान, पंचांनी ताहिरविरोधात पॅसिवीटी घोषित केली. काही वेळातच नवीनने ताहिरला खाली खेचत दोन गुण घेतले. यानंतर नवीनने दोन्ही पाय धरून ताहिरला पट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ताहिरने स्वतःचा बचाव केला. पहिल्या फेरीअखेर नवीन २-० ने आघाडीवर होता.
पाकिस्तानी कुस्तीपटू दुसऱ्या फेरीत बचावात्मक खेळू लागला. येथेच नवीनचे वर्चस्व गाजवायला सुरुवात केली त्यानंतर त्याने आणखी तीन गुण घेत गुणसंख्या ५-० अशी केली. त्यानंतर नवीनने चार गुणांचा डाव टाकत आघाडी ९-० अशी वाढवल. येथे नवीनला आणखी एका गुणाची गरज होती ज्याद्वारे तो टेक्निकल सुपरीएरिटीच्या जोरावर सामना जिंकला असता. परंतु ताहिरने त्याचे मनसुबे उधळून लावले. मात्र, त्याचवेळी दुसरी फेरी देखील संपुष्टात आल्याने सुवर्णपदक नवीनच्या गळ्यात पडले.
दुसऱ्या दिवशीही कुस्तीत भारताचे वर्चस्व
शुक्रवार प्रमाणे भारतीय पथकासाठी शनिवारचा दिवसही सुवर्णमयी ठरला. शनिवारी भारताच्या कुस्तीपटूंनी आणखी तीन सुवर्णपदके पटकावली. नवीनच्या आधी ऑलम्पिक रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी कुमार दहियाने सुवर्ण जिंकले. तसेच आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगटनेही सलग तिसरे राष्ट्रकुल सुवर्ण आपल्या नावे केले. याव्यतिरिक्त पूजा सिहाग व पूजा गहलोत यांनी कांस्यपदक पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या–
टी२० विश्वचषकाच्या तयारीवरून दिनेश कार्तिकचे बडे बोल! म्हणाला, ‘भारताला…’
इंग्लंडला बगल देत टीम इंडियाने गाठली फायनल! स्म्रीतीचे अर्धशतक तर गोलंदाजीत ‘या’ खेळाडूने दाखवले कसब