भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून काल ओली पोपने पदार्पण केले. आज त्याला फलंदाजीची संधी मिळाली. दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यावर त्याला आज संधी मिळाली.
फलंदाजीला आल्यावर त्याने दुसऱ्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारत आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली.
लाॅर्ड्सवर खेळायला मिळालेला तो तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याचे सध्या वय २० वर्ष आणि २२१ दिवस आहे.
गेली दोन वर्ष तो शालेय क्रिकेट खेळत होता. गेल्या वर्षी इंग्लंडमधील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पोपने या वर्षीच्या कौंटी क्रिकेट मोसमात ८५.५० च्या सरासरीने ६८४ धावा केल्या आहेत.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघात निवड झाल्यानंतर २० वर्षीय ओली पोपचा आनंद गगणात मावेनासा झाला होता.
“मला विश्वास बसत नाही की भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी माझा इंग्लंड संघात सामावेश झाला आहे. मला असे कधी वाटलेही नव्हते की इतक्या लवकर माझा इंग्लंड संघात समावेश होईल.” ओली पोप पत्रकारांशी बोलताना म्हणाला होता.
यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या ओली पोपच्या भात्यात सर्व प्रकारचे क्रिकेटींग शॉट आहेत. तसेच त्याला फिरकी गोलंदाजांचाही उत्तमपणे सामना करता येतो.
ओली पोलकडे फिरकी गोलंदाजांचा सामना करण्याची असलेली क्षमता भारताच्या आर. अश्विनचा सामना करताना इंग्लंसाठी लाभदायक ठरु शकते.
तसेच पोपची संघात निवड होण्यापूर्वी, ब्रिटिश प्रसार माध्यमात पोपची इंग्लंडच्या कसोटी संघात निवड होण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. तसेच या आशयाच्या काही बातम्याही त्याने वाचल्या होत्या. मात्र ओली पोपने हे गांभीर्याने घेतले नव्हते.
“मी गेल्या काही दिवसात एक-दोन बातम्या वाचल्या होत्या. त्यामध्ये माझी भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात निवड होण्याची शक्यता वर्तवली होती. मी मात्र या बातम्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. मी जर याचा विचार करुन या अपेक्षेवर बसलो असतो आणि माझी निवड झाली नसती तर माझा हिरमोड झाला असता.” असे ओली पोप पुढे म्हणाला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-उपकर्णधार या नात्याने रहाणेची काहीच जबाबदारी नाही का?
-हे विधान करुन सचिनने एकप्रकारे पृथ्वी शाॅला टीम इंडियात घेण्याचे सुचीत केले असावे