fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

खरे बोलल्याने ‘या’ पाकिस्तानी खेळाडूचे नेतृत्व घेण्यात आले होते काढून

Younis Khan: I Lost Captaincy For Speaking The Truth

मुंबई । पाकिस्तानचा माजी कर्णधार युनुस खान हा कसोटी क्रिकेटमधील यशस्वी फलंदाज आहे. आपल्या संघाकडून  खेळताना कसोटीत त्याने सर्वाधिक धावा काढल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 10 हजार 999 केल्या आहेत. यात  ६ दमदार द्विशतके आणि 34 शतकांचा समावेश आहे. युनूस खानच्या नेतृत्वाखालीच पाकिस्तान संघाने  2009 च्या  टी20 विश्वचषक जिंकला होता. अशा एका चॅम्पियन खेळाडूला खरे बोलल्याने संघातून बाहेर काढल्याचा धक्कादायक खुलासा स्वतः युनुस खानने केला आहे.

युनुस खान प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला की, खरे बोलल्याने त्याची पाकिस्तान संघातून हकालपट्टी करण्यात आल्याचा सनसनाटी खुलासा केला आहे. तो नेहमी खरं बोलत असल्याने त्याच्या संघातील सहकारी त्याला वेडा समजायचे. आपण आपल्या देशासाठी शंभर टक्के प्रदर्शन देत नसल्याचे युनुस खानने आपल्या सहकार्याने सांगितलेले होते. संघातील खेळाडूंनाही तो आवडत नसे.

युनुस पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या आयुष्यात असे काही प्रसंगात तेव्हा तुम्हाला खरेच बोलावे लागते आणि लोक तुम्हाला वेडे समजतात. माझी चूक एवढीच होती की, मी सर्व सर्वच खेळाडूंच्या समोर देशासाठी चांगले प्रदर्शन करत नसल्याचे सांगितले होते. नंतर या घटनेची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर मला संघातून बरेच दिवस बाहेर काढले. पुन्हा संघात कधी संधी मिळाली नाही. मला माहित आहे की मी काहीच चुकीचे केले नाही. माझ्या वडिलांनी मला नेहमी खरे बोलायला शिकवले होते.

या वेळी युनिस खानने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे देखील कौतुक केले. तो म्हणाला की, या दोन खेळाडूंना बाद करण्यासाठी गोलंदाजांना परिश्रम घ्यावे लागते. त्यांना बाद करण्यासाठी गोलंदाज व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून फलंदाजीतील कमकुवत दुवे शोधत असतात. तरी देखील हे दोघे धावा करण्यात यशस्वी ठरतात. हे फारच कौतुकास्पद आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-पाकिस्तानचा हा खेळाडू शाहिद आफ्रिदीवर भडकला, बोलताना जरा…

-टीकटॉक स्टार झालेल्या चहलला टीकटॉक चाहत्यांनीच केले ट्रोल

-…तर गोलंदाजांना मास्क लावून खेळवावे

You might also like