---Advertisement---

नाराज युवराज पाकिस्तानी खेळाडूंना म्हणाला, जा आणि चांगले सेलिब्रेशन करा

On: मंगळवार, जून 23, 2020 5:08 PM
---Advertisement---

जवळपास तीन वर्षांपूर्वी २०१७ मध्ये पाकिस्तानने भारताला पराभूत करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. सरफराज अहमदच्या नेतृत्वात पाकिस्तानने लंडन येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताला मोठ्या फरकाने पराभूत केले.

या ऐतिहासिक विजयात फखर झमानने(Fakhar Zaman) शतक ठोकलं होतं. पाकिस्तानच्या या ऐतिहासिक विजयाचा अनुभवी फलंदाज शोएब मलिकही(Shoaib Malik) हिस्सा होता. मलिक म्हणाला की त्या विजयाचे मनामध्ये एक विशेष स्थान आहे. पाक पॅशनशी बोलताना मलिक म्हणाला की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.

मलिककडे याच सामन्याला जोडून एक खास आठवण देखील आहे. तेव्हा भारतीय संघ अंतिम फेरीत पराभूत झाला होता, तेव्हा युवराजसह सर्वच खेळाडू नाराज होते. परंतु तरीही भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी गप्पा मारताना दिसले होते.

भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंमध्ये असलेल्या मैत्रीबद्दल बोलताना मलिक म्हणाला, “पाकिस्तान जिंकल्यानंतर तो (मलिक) युवराज सिंग(Yuvraj Singh) बरोबर बोलत होता. पण त्यावेळी युवराज त्याला म्हणाला जा आणि आपल्या संघाबरोबर विजयाचा आनंद साजरा कर. ”

मलिक म्हणाला, “मला आठवते की ओव्हलमध्ये भारतावर विजय मिळवल्यानंतर मी आणि युवराज जेवणाच्या हॉलमध्ये बसून बोलत होतो. मग तो म्हणाला की तुझे संघ सहकारी आनंद साजरा करीत आहेत. हा खास क्षण गमावू नको. तुसुद्धा संघासह आनंद साजरा केला पाहिजे. क्रिकेटर्समध्ये चांगली मैत्री कशी असते. याचे हे एक छोटेसे उदाहरण आहे.”

सानियाबरोबर(Sania Mirza) लग्न करण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल बोलताना मलिकने म्हणाला, “दोन्ही देशांमधील संबंधांची आपल्याला अजिबात चिंता नाही. लग्न करण्यासाठी प्रेम महत्वाच आहे. नाही की समोरचा देश.”

“लग्नासाठी तुमचा जोडीदार कुठला आहे. याची काळजी करू नका किंवा दोन्ही देशांमधील नातं कसं आहे. राजकारणात काय चालले आहे हे पाहणं आमचे काम नाही. जर आपण एखाद्यावर प्रेम केले असेल आणि त्याच्या बरोबर लग्न केलं असेल. जे झालं पाहिजे. मग भलेही तुम्ही कोणत्याही देशातून आले असाल,” असेही तो पुढे म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---