मोहाली। भारताने बुधवारी(18 सप्टेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 150 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान 19 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.
भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. विराटने या सामन्यात केलेल्या शानदार कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराटचे अभिनंदन केले आहे.
विराटने या सामन्यात 52 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 चौकार 3 षटकार मारले. विराटचे हे आंतरराष्ट्रीय टी20मधील 22 वे अर्धशतक आहे. त्याचबरोबर विराटची पुन्हा एकदा टी20मध्ये फलंदाजीची सरासरी 50 पेक्षा अधिक झाली आहे.
त्यामुळे तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कसोटी, वनडे आणि टी20 प्रकारात प्रत्येकी 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची सरासरीने असणारा सध्याचा एकमेव क्रिकेटपटू आहे. याबद्दल आयसीसीने ट्विट केले होते.
या ट्विटवर कमेंट करताना आफ्रिदीने म्हटले आहे की ‘अभिनंदन कोहली! तू खरंच दिग्गज खेळाडू आहे. तूला कायम यश मिळो आणि तू जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे असेच मनोरंजन करत रहा.’
Congratulations @imVkohli You are a great player indeed, wish you continued success, keep entertaining cricket fans all around the world. https://t.co/OoDmlEECcu
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) September 18, 2019
विराटची सध्या कसोटीची सरासरी 53.14 ची आहे. तर वनडेत 60.31 आणि टी20मध्ये 50.85 अशी सरासरी आहे. त्याचबरोबर विराट आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला आहे. विराटने आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 71 सामन्यात 50.85च्या सरासरीने 2441 धावा केल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–रोहित शर्मा १२ धावांवर बाद झाला पण केला हा मोठा विक्रम
–आजच्याच दिवशी युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारत रचलेला होता इतिहास, पहा व्हिडिओ
–टॉप ५: विराट कोहलीने द.अफ्रिकेविरुद्ध अर्धशतकी खेळी करत केले हे खास ५ विक्रम