भारताचा स्टार टेनिसपटू युकी भांबरीने इंडियन वेल्स स्पर्धेत चांगला खेळ केल्याने त्याला एटीपीच्या ताज्या क्रमवारीत तीन स्थांनाचा फायदा झाला आहे. तर दुसरीकडे मात्र भारतीय महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा डब्ल्यूटीएच्या महिला दूहेरीतील पहील्या पंधराच्या क्रमवारीतून बाहेर पडली.
युकीने इंडियन वेल्स स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमधील पहील्या दोन फेरीत त्याच्यापेक्षा चांगली क्रमवारी असणाऱ्या खेळाडूंना पराभूत केले. यामुळे युकी आता जागतिक क्रमवारीत 107व्या स्थानावर पोहचला आहे.
या एटीपीच्या पुरूष एकेरी क्रमवारीत युकीनंतर रामकुमार रामनाथन (136 व्या स्थानी), सुमित नागल ( 218 व्या स्थानी) हे भारतीय टेनिसपटू आहेत.
तसेच दुहेरीच्या क्रमवारीत रोहन बोपन्ना 20व्या स्थानावर आहे. तर दिविज शरण 44व्या आणि डेविस कपमधून पुनरागमण करणारा अनुभवी लिएंडर पेस 45व्या स्थानावर पोहचला आहे. पुरव राजाची एका क्रमाकांने 63व्या तर विष्णु वर्धनची पाच क्रमाकांने 104व्या स्थानावर घसरण झाली.
दुखापतीमूळे कोर्ट पासुन काही काळ दूर असल्याने सानियाची तीन स्थानांची घसरण झाली. ती आता डब्ल्यूटीएच्या महिला दूहेरी क्रमवारीत 16व्या स्थानी आली आहे.