---Advertisement---

युएईत दिसणार ‘पठाण पॉवर’! नव्या टी20 लीगमध्ये कॅपिटल्ससाठी दाखवणार टशन

On: सोमवार, डिसेंबर 19, 2022 8:51 PM
Yusuf-Pathan-Legends-League-Cricket
---Advertisement---

सध्या क्रिकेटजगतात विविध व्यावसायिक टी२० लीग नव्याने सुरू होत‌ आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत एक नवी कोरी टी२० लीग‌ खेळली जाणार आहे. त्याचबरोबर संयुक्त अरब अमिरातीतही (युएई) त्याचवेळी टी२० लीग सुरू होईल. युएईतील या लीगमध्ये वर्तमान क्रिकेटमधील अनेक नामांकित क्रिकेटपटू खेळताना दिसतील. त्यातच आता दोन निवृत्त भारतीय खेळाडूंच्या नावाचा देखील समावेश झाला आहे.

या स्पर्धेतील एक संघ दुबई कॅपिटल्स हा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या मालकांनी खरेदी केला आहे. त्याच लीगसाठी आता त्यांनी भारताचा माजी अष्टपैलू व दोन विश्वचषक विजेत्या संघांचा सदस्य असलेला युसुफ पठाण व फलंदाज रॉबिन उथप्पा यांचा आपल्या संघात समावेश केला. आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली.

 

पठाण तीन वर्षांपासून आयपीएलचा भाग नाही. त्याने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय तसेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तो निवृत्त क्रिकेटपटूंच्या लिजेंड लीग क्रिकेट व रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसला आहे. तर, उथप्पाने यावर्षी आयपीएलनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम ठोकला होता.

 

दुबई कॅपिटल्स संघात याआधीच अनेक टी20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा भरणा आहे. यामध्ये वेस्ट इंडिजचा रोवमन पॉवेल, श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका तसेच झिम्बाब्वेचा सिकंदर रझा अशी नावे सामील आहेत.

इंटरनॅशनल लीग टी२० स्पर्धेचा पहिला हंगाम ६ जानेवारी २०२३ ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत सहा संघांमध्ये अबुधाबी, दुबई आणि शारजाह स्टेडियममध्ये ३४ सामने खेळवले जाणार आहेत.

(Yusuf Pathan And Robbin Uthappa Play For Dubai Capitals In International League T20)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फुटबॉलचा नवा राजकुमार! हॅट्रिक मारत अर्जेंटिनाच अवसान घालवलेला बाजीगर एम्बाप्पे
लेकाने विश्वचषक जिंकताच थेट मैदानात धावली आई, आनंदाच्या भरात मेस्सीला मारली मिठी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---