---Advertisement---

युवराज आणि पीटरसनमध्ये ट्वीटरवॉर, एकाच्या उत्तराला दुसऱ्याकडून वरचढ प्रत्युत्तर; एकदा वाचा

On: रविवार, मे 8, 2022 6:00 PM
Kevin Pietersen and Yuvraj Singh
---Advertisement---

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी (०७ मे) मॅन्चेस्टर युनायटेडला ब्राइटनने ४-० च्या फरकाने पराभूत केले. या पराभवानंतर मॅन्चेस्टर युनायटेड गुणतालिकेत सहाव्या स्थानावरच राहिला आणि त्यांच्या पुढील वर्षी चँपियन्स लीग खेळण्याच्या शक्यता संपुष्टात आल्या. कारण इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये पहिल्या चारमध्ये असलेले संघच चँपियन्स लीगमध्ये खेळण्यासाठी पात्र ठरतात. परंतु आता ब्राइटनविरुद्धच्या पराभवानंतर मॅन्चेस्टर युनायटेडचे युरोपा लीगमध्ये खेळणे अवघड बनले आहे.

मॅन्चेस्टर युनायटेडची (Manchester United) ही अवस्था पाहून इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) याला डिवचले. या प्रकरणावरून त्यांच्यात ट्वीटरवर बराच वादही झाला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

युवराज मॅन्चेस्टर युनायटेड क्लबचा मोठा चाहता आहे आणि पीटरसनचा आवडता फुटबॉल क्लब इंग्लिश क्लब चेल्सी हा आहे. गतवर्षीही या दोघांमध्ये आपापल्या आवडत्या फुटबॉल क्लबवरून भिडंत झाली होती. यावेळीही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे.

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मॅन्चेस्टर युनायटेड पराभूत झाल्यानंतर त्वरित पीटरसनने ट्वीट केले. ‘जर कोणाला माहिती असेल की, युवराज सिंग कुठे आहे, तर त्याला सांगाल की, या वाईट समयी मी त्याच्याबद्दल विचार करत आहे,’ असे पीटरसनने लिहिले. पीटरसनने या ट्वीटमध्ये हसण्याचा इमोजीही जोडला आहे.

https://twitter.com/KP24/status/1522997043957882880?s=20&t=HRhVMbM3C2sRbHkAvoa0EA

या ट्वीटवर उत्तर देताना युवराज म्हणाला की, ‘धन्यवाद मित्रा. मलाही चँपियन्स लीगदरम्यान तुझा विचार आला होता.’ चँपियन्स लीगमध्ये उपांत्यपूर्व फेरी सामन्यात पराभूत झाल्यानंतर चेल्सीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. यावरून युवराजने पीटरसनला टोमणा मारला. युवराजच्या प्रत्युत्तरानंतर पीटरसननेही माघार घेतली नाही.

त्याने ट्वीट करत लिहिले की, ‘तुला चँपियन्स लीग काय आहे, हे माहिती आहे का?.’ यावर युवराजने उत्तर दिले की, नाही. ‘मला माहिती नाही. तू खेळाविषयी सर्व माहिती ठेवतोस. तूच ट्वीटरवरील संपूर्ण जगाला याबद्दल माहिती दे.’

https://twitter.com/KP24/status/1522998375653601281?s=20&t=X_d33p_fucvnGoCnv8B6YA

यावर पीटरसन म्हणाला की, ‘ही एक स्पर्धा असते, ज्यामध्ये चेल्सी खेळतो, मॅन्चेस्टर यूनायटेड नाही. ही ती स्पर्धा आहे, जिथे युरोपमधील सर्वात चांगले फुटबॉल क्लबच खेळतात.’ पीटरसनने असे उत्तर दिले कारण मॅन्चेस्टर युनायटेड यावेळी चँपियन्स लीगच्या राउंड ऑफ १६ मध्येच बाहेर झाला होता आणि चेल्सीने उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास केला होता.

https://twitter.com/KP24/status/1523001068602286082?s=20&t=TliFOQSVWcq2lXru_8Z0PA

युवराज आणि पीटरसनमधील हा वाद पुढे अजून चालला. बराच वेळ हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या आवडत्या फुटबॉल क्लबवरून भिडताना दिसले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

दिल्लीला धक्क्यावर धक्के! सीएसकेविरुद्धच्या ‘करा अथवा मरा’ सामन्यापूर्वी पृथ्वी शॉ रुग्णालयात दाखल

ज्याने टीम इंडियात घेतली होती जागा, आता त्यालाच बाहेर करत चहल गाजवणार टी२० विश्वचषक?

क्या बात! टुचू टुचू बॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या पुजाराचा पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड षटकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---