भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग गुरुवारी (12 डिसेंबर) 43 वर्षांचा झाला. टी20 आणि एकदिवसीय विश्वचषक विजेत्या युवीनं आपल्या अष्टपैलू कामगिरीनं टीम इंडियाला अनेकवेळा संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. युवीची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये होते.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही युवी मोठी कमाई करत आहे. भारतातील श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत त्याचा समावेश आहे. आपल्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेला युवराज जाहिरातींमधून दरमहा कोट्यवधी रुपये कमावतो. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला युवराज सिंगच्या एकूण कमाईबद्दल सांगणार आहोत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराज सिंगची एकूण संपत्ती 291 कोटी रुपये आहे. 2019 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराज सिंगकडे सध्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती आहेत. याद्वारे तो कोट्यवधी रुपये कमावतो. याशिवाय युवीनं अनेक स्टार्टअप्स सुरू केले आहेत, ज्याद्वारे देखील तो कमाई करत आहे.
युवराज सिंगची वैयक्तिक मालमत्ता 50 कोटी रुपयांहून अधिक आहे. युवीच्या मुंबईत दोन आलिशान अपार्टमेंट आहेत. 2013 मध्ये त्यानं वरळीतील लक्झरी रेसिडेन्शिअल टॉवर ओंकार 1973 मध्ये दोन अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी 64 कोटी रुपये खर्च केले होते. याशिवाय त्याची चंदीगड दोन मजली हवेली असून गोव्यातही एक घर आहे.
युवराज सिंग गाड्यांचा मोठा चाहता आहे. त्याच्याकडे विविध कारचा मोठा साठा आहे. अहवालानुसार, युवीकडे बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, लाँब्रिगिनी मर्सिएलागो, बीएमडब्ल्यू एम5 ई60, बीएमडब्ल्यू एक्स6एम आणि ऑडी क्यू5 यांसरख्या महगड्या कार आहेत. याशिवाय सोशल मीडियावर युवीची मोठी फॅन फॉलोइंग आहे. यावर तो विविध ब्रॅन्ड्सच्या जाहिराती करून मोठी कमाई करतो.
हेही वाचा –
गाबा कसोटीसाठी भारतीय संघात होणार अनेक बदल, या दोन खेळाडूंचं बाहेर होणं निश्चित
Birthday Special; युवराज सिंगचे 5 मोठे रेकॉर्ड जे आजही अभेद्य, आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी
टी20 विश्वचषक विजयापासून रोहित-विराटची निवृत्ती, भारतासाठी कसं राहिलं 2024 हे वर्ष?