---Advertisement---

युवराज सिंगचा गंभीर आरोप; माझ्याबरोबर केला गेला गैरव्यवहार, असं नक्कीच अपेक्षित नव्हतं

On: सोमवार, जुलै 27, 2020 1:02 PM
---Advertisement---

मुंबई । माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंगने त्याच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात चांगली वागणूक न दिल्याचा आरोप केला आहे. जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले गेलेला युवराज गेल्या वर्षी जूनमध्ये निवृत्त झाला होता.

2007 टी 20 आणि 2011 मधील वनडे विश्वचषकाच्या विजयी संघाचा सदस्य असलेल्या युवराजने आणखी काही खेळाडूंची नावेही सांगितली ज्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उत्कृष्ट होती, तरीही त्यांचा शेवट चांगला झाला नाही.

‘स्पोर्ट्सकीडा’शी बोलताना युवी म्हणाला की, “मला वाटते की माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात गैर व्यवहार झाला होता. जेव्हा मी हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान यासारख्या महान खेळाडूंना पाहतो तेव्हा त्यांनाही चांगली वागणूक दिली जात नव्हती. हा भारतीय क्रिकेटचा एक भाग आहे. मी या आधीही हे पाहिले आहे, म्हणूनच मला याबद्दल आश्चर्य वाटले नाही.”

“भविष्यात जो कोणी बर्‍याच दिवसांपासून भारतासाठी खेळेल, तो एका कठीण परिस्थितीतून जात असेल, तर तुम्ही त्याला नक्कीच आदर दिला पाहिजे. गौतम गंभीरने आमच्यासाठी दोन विश्वचषक जिंकले. सुनील गावसकरानंतर वीरेंद्र सेहवाग हा आमच्यासाठी सर्वात मोठा सामना जिंकून देणारा खेळाडू होता. व्हीव्हीएस लक्ष्मण, झहीर खानसारख्या खेळाडूंचा सन्मान झाला पाहिजे होता,” असेही युवराज सिंग म्हणाला.

तो म्हणाला, “मी एक महान खेळाडू आहे, असे मला वाटत नाही. मी हा खेळ संपूर्ण सन्मानाने खेळला आहे, परंतु मी जास्त कसोटी क्रिकेट खेळल्या नाहीत. ज्यांचा कसोटीतील विक्रम शानदार आहे तेच महान खेळाडू. मी स्वतःला महान खेळाडू मानत नाही.”

महत्त्वाच्या बातम्या- 

–मुंबई इंडियन्स आहे आयपीएल विजेतेपदाचा दुसरा प्रबळ दावेदार, तर या संघाला आहे सर्वाधिक संधी
–१९८३ विश्वविजेत्या भारतापेक्षा पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळाले होते २६पट जास्त पैसे, रमीज राजाने शेअर केला फोटो
–आयर्लंडच्या क्रिकेटरला होतोय स्टेडियमधील खुर्च्यांचा त्रास, चेंडू शोधायला जातोय खूप वेळ
–आयपीएल २०२०साठी हा संघ सर्वात आधी जाणार दुबईला, काहाही करुन जिंकायची आहे आयपीएल ट्रॉफी

वाचनीय लेख-
–क्रिकेट वेडापायी वसईचा पाटील खेळला युएईकडून; कर्णधार होऊन केले भारताविरुद्धच दोन हात, वाचा संपुर्ण स्टोरी
–झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली
–टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ४- शैलीच्या विपरीत खेळत डिविलीयर्सने २२० चेंडूत ३३ धावा केल्या, परंतू क्रिकेटरसिकांच्या हृदयात..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---